वाहतुक कोंडी अन् रस्त्यांवरील अतिक्रमण ऐरणीवर बसस्थानक व रथ मार्गाच्या काँक्रीटीकरणामुळे २५ वर्षापासूनचा प्रश्न संपुष्टात

वाहतुक कोंडी अन् रस्त्यांवरील अतिक्रमण ऐरणीवर  बसस्थानक व रथ मार्गाच्या काँक्रीटीकरणामुळे २५ वर्षापासूनचा प्रश्न संपुष्टात
Published on: 
वेध प्रभागाचा --- प्रभाग क्र. १२ (भगतमळा, वंजार गल्ली, बसस्थानक परिसर, रामनगरी, शिवाजीनगर इच्छामणी मंदिर परिसर) --- वाहतूक कोंडी, अतिक्रमणाने प्रभागातील नागरिक त्रस्त पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्तीची मागणी; वाजे विद्यालयाजवळील मार्गाचे २५ वर्षांनंतर काँक्रिटीकरण संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ७ ः नेहरू चौकापासून ते शिवाजीनगरच्या जलकुंभापर्यंत, रामनगरीपासून ते शिवाजीनगर मार्गापर्यंत या प्रभागाचा भाग व्यापलेला आहे. शहर व उपनगरे असा संमिश्र असलेला प्रभाग असला तरी प्रभागातील वाहतूक कोंडी, अनधिकृत दुकाने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेहरू चौकापासून ते बसस्थानकापर्यंत सूर्योदय संकुलासमोरून जाणारा मार्ग कायम रस्त्यातील वाहनांच्या पार्किंगने भरलेला असतो. या मार्गावर चारचाकी वाहन आले तर वाहतुक कोडी सुटता सुटत नाही. अशीच अवस्था लोकनेते वाजे विद्यालयाजवळ आहे. बसस्थानकाकडे जाणारा हा मार्ग दुतर्फा अतिक्रमित दुकानांमुळे व्यापून गेला आहे. त्यामुळे या मार्गाने तर स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना पायी चालणे मुश्कील होऊन बसले आहे. नेहरू चौक ते गावठा मार्ग अरुंद आहे. त्यात रस्त्यात वाहनांची पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. प्रभागात जुन्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. भिकुसा शाळेजवळील उपनगरात कॉलनी रस्ते होणे बाकी आहे. पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांनी होत असल्याने किमान दिवसआड करण्याची मागणीही आहे. शिवाजीनगर जलकुंभाजवळील रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ...ही कामे पूर्णत्वास बसस्थानकाकडे जाणारा वाजे विद्यालयाजवळील मार्ग २५ वर्षांनंतर मार्गी लागला. शहरातून बसस्थानकाकडे जाण्यासाठी हा सर्वाधिक जवळचा मार्ग आहे. या मार्गाचे नुकतेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. पाचोरे गल्ली रथमार्गाचे काम सुरू आहे, तर वंजारी गल्लीचे काम मंजूर आहे. महिलांसाठी शहरातील पहिली बंदिस्त जीम भिकुसा शाळेजवळ साकारली जात आहे. रामनगरीत भिडेश्वर मंदिराजवळ सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव - शिवाजीनगर जलकुंभ ते जुना झापवाडी मार्ग काँक्रिटीकरण - रामनगरी, भगत मळ्यात रस्ते काँक्रिटीकरण - प्रभागातील रथ मार्गातील वीज वाहिन्या भूमिगत - इच्छामणी मंदिरासाठी सभामंडप, शिवाजीनगरात अभ्यासिका --- नगरसेवक काय म्हणतात रथ मार्गांचे काँक्रिटीकरण, भूमिगत वीज वाहिन्या करणार आहे. नागरिकांनी बोलावले तर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लगेचच प्रतिसाद दिला जातो. - सुदर्शन नाईक, नगरसेवक --- नागरिक काय बोलतात महिलांसाठी जीम साकारली जाणार असल्याने त्याचा आनंद आहे. इतर समस्या मार्गी लागण्यासाठी प्रतिसाद दिला जातो. - अनुराधा देवनपल्ली, रहिवासी, भिकुसा शाळा परिसर --- प्रभागातील समस्या मार्गी प्रभागात विजेची समस्या होती. ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने ती सुटली आहे. नागरिकांनी बोलवताच नगरसेवक प्रतिसाद देत असल्याने समस्या मार्गी लागत आहेत. - हेमंत कुलकर्णी, रहिवासी, शिवाजीनगर --- (उद्याच्या अंकात - प्रभाग क्र. १३ ः गावठा मारुती मंदिर, शिवाजीनगर, पांडवनगरी, गावठा) --- फोटो क्र. १) सिन्नर ः रामनगरी येथे भिडेश्वर मंदिर सुशोभीकरणाचे सुरू असलेले काम. सिन्नर ः सूर्योदय संकुलासमोर रस्त्यातील वाहन पार्किंगमुळे अशी वाहतूक कोंडी नेहमी होते. ३) सुदर्शन नाईक ४) अनुराधा देवनपल्ली ५) हेमंत कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.