ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर बागुल यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर बागुल यांचे निधन
Published on: 
प्रभाकर बागुल NSK26H34440 २०-२ ज्येष्ठ साहित्यिक बागूल यांचे निधन नाशिक, ता.४ ः राजीवनगर येथील रहिवासी निवृत्त मुख्याध्यापक व ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर मुरलीधर बागूल (८४) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. देविदास बागूल यांचे ते ज्येष्ठ बंधू तर योगेश बागूल व वैशाली खैरनार यांचे वडिल होत. -श्री. बागूल यांनी जीवन संघर्षावर आपल्या लेखणीने मात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचा साहित्य निर्मितीचा प्रवास सुरू झाला.शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास त्यांनी केला. बागलाण तालुक्यातील कंधाणे, ताहाराबाद, सोमपूर, वडाळी भोई, मखमलाबाद आणि शेवटी अंबासन ग्रामीण भागात त्यांनी सेवा बजावली. इतिहास विषयातील गोडीने अनेक ऐतिहासिक व पौराणिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी घरातील सोन्याचा दागिना विकण्याची वेळ आली; पुढे प्रकाशकांकडून फसवणूक झाली. मात्र, या अडचणींनी ते खचले नाही. त्यानंतर त्यांनी शंभरपेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती करून मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखनात ग्रामीण जीवन, इतिहास, समाजजीवन आणि मानवी भावविश्वाचे प्रतिबिंब दिसतात. सार्वजनिक वाचनालयाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.