
गोदावरी बँक निवडणुकीमध्ये प्रगती पॅनल बिनविरोध विजयी
नाशिक : गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर प्रगती पॅनल बिनविरोध विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी हे जाहीर केले. तसेच प्रमाणपत्र दिले. (Latest marathi news)
बँकेच्या माजी अध्यक्षा वास्तुविशारद अमृता वसंतराव पवार यांनी ही माहिती दिली. 2022 ते 2027 या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. 15 जागांसाठी 15 उमेदवार अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
हेही वाचा: भारतीय बाजारपेठेत या महिन्यात लाँच होणार तीन पॉवरफुल बाइक्स
बिनविरोध निवडून आलेल्यांची नावे अशी : सर्वसाधारण गट-अभियंता प्रणव पवार, सी. ए. राजाराम बस्ते, वसंत खैरनार, सुरेश पाटील, ऍड दत्तात्रय पिंगळे, रवींद्र मणियार, मनोहर दगाजी देवरे, अमोल महाले, अनिल भालेराव, विवेक तांबे. अनुसूचित जाती-जमाती गट- डॉ तानाजी कानडे, इतर मागासवर्गीय गट- योगेश (मुन्ना) हिरे, भटक्या विमुक्त जाती-जमाती गट- दौलतराव बोडके, महिला गट- अमृता पवार, अनिता महेश भामरे.
हेही वाचा: महाविकास आघाडीची भूमिका उद्या ठरणार
Web Title: Pragati Panel Wins In Godavari Bank Elections Latest Nashik Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..