व्यवस्थेला शेतकरी, विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही!

व्यवस्थेला शेतकरी, विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही!
Published on: 
पान ३ NSK26H32903 मु. शं. औरंगाबादकर सभागृह : जिल्हास्तरीय ५७ व्या साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी प्रकाश होळकर. व्यासपीठावर डावीकडून विक्रांत जाधव, सुनील कुटे, एकनाथ पगार, बी. जी. शेखर, दिलीप फडके, राजू बाविस्कर, अरुण ठोके, राजू देसले, राजेश गायकवाड आदी. ---------------- जनतेचा आक्रोश व्यवस्थेला ऐकू येत नाही! --- प्रकाश होळकर यांची खंत : जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मांडला साहित्यिक प्रवास सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : स्त्रीकडे बोलण्यासारखे खूप काही असते, पुरुष मात्र आपल्या भावना सहजपणे व्यक्त करीत नाही. एकदा हातातून निघून गेलेली गोष्ट पुन्हा येत नाही; म्हणूनच आपल्याकडे जे काही सांगण्यासारखे असते, ते सांगितले पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या रूपक कथेचा दाखला देत कवी प्रकाश होळकर यांनी, निसर्गाने खाण्यासाठी व बोलण्यासाठी एक तोंड; तर ऐकण्यासाठी दोन कान दिले असताना आजच्या व्यवस्थेला शेतकरी, विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकू येत नसल्याची खंत व्यक्त केली. ----------------- सार्वजनिक वाचनालय आयोजित ५७ व्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (ता. १८) दिवसभर संमेलन झाले. व्यासपीठावर माजी संमेलनाध्यक्ष एकनाथ पगार, साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. अरुण ठोके, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, उद्‍घाटक राजू बाविस्कर, कविसंमेलनाध्यक्ष राजू देसले, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला माजी संमेलनाध्यक्ष डॉ. बी. जी. शेखर यांनी नूतन अध्यक्ष प्रकाश होळकर यांना अध्यक्षपदाचे पदक प्रदान केले. होळकर यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनेक संस्मरणीय प्रसंग आणि आठवणींना उजाळा देत पहिल्यावहिल्या ‘गोविंद’ कविता स्पर्धेतील पुरस्काराचा प्रसंग सांगताना, त्याकाळी मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद आणि आपले साहित्य क्षेत्रातील पहिले पाऊल यावर भाष्य केले. गुरू विजय काचरे आणि इतर गुरुजनांनी आपल्याला कसे घडविले आणि लिहिते केले, याचा उल्लेख केला. राजेंद्र सोमवंशी यांनी परिचय करून दिला. उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले. सावळीराम तिदमे यांनी आभार मानले. ---------------- संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विविध साहित्यिक पुरस्कारांचे वितरण, पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सत्कार समारंभ, तसेच लेखिका रेखा भांडारे यांच्या ‘संवाद नरहर कुरुंदकरांशी’ व ‘इंदिरा संत : एक अपूर्व ऋणानुबंध’ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘लेखकांचे मनोगत’ कार्यक्रम पार पडला. दरम्यान, सोमवारी (ता. १९) सायंकाळी पाचला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘स्मृतींच्या काव्यवाटा’ कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होईल. ----------- २०-२ ‘अनुवाद’ शिकण्याचे उत्तम व्यासपीठ वर्ष २००६ मध्ये ‘गुगल ट्रान्सलेट’वर नेमक्याच भाषा उपलब्ध होत्या. आजच्या घडीला ३०० भाषांचे भाषांतर ‘गुगल’वर करता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर भाषांतर करता येत असले, तरी त्यात शब्दांचे सौंदर्य नसते. त्यामुळे ‘एआय’ फक्त मदतनीस म्हणून काम करू शकतो. अनुवाद करताना लेखकाचे विचार त्यात असतात. अनुवादकाला केवळ वाचकापर्यंत भाषा पोहोचवायची असते. त्यामुळे अनुवाद शिकण्याचे उत्तम व्यासपीठ असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘अनुवादित साहित्य’ या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर, प्रा. सतीश श्रीवास्तव यांनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे समन्वयक होत्या. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com