नाशिक- भारतीय पुरातत्त्व खात्याकडे वर्ग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात लाडूचा प्रसाद वाटण्यास पुरातत्त्व विभागाने बंदी घातली आहे. प्रसाद वाटप केल्यास मंदिराच्या विश्वस्तांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचे पत्र या विभागाने पोलिसांना दिले आहे.