मालेगाव- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. हिरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. पंधरा दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या होत्या.