शालेय जीवनात कबड्डीविषयी निर्माण झालेली आवड आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने प्रसाद मते याने राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतचा प्रवास यशस्वी केला आहे. सुरुवातीच्या काळात संथ गतीने वाटचाल सुरू असली, तरी क्रीडाकौशल्ये आत्मसात करीत त्याने गती धरली. तो केवळ खेळाडू राहिला नसून, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून भूमिका बजावली. कबड्डीत तो कर्तबगारी दाखवू लागला आहे.