Nashik News : तक्रार नाही, मात करायची : प्रतापराव पवार

आयुष्यात आपल्याकडे काही गोष्टी नसल्या तरी त्याची तक्रार न करता ते मिळविण्यासाठी प्रयत्न करा. वस्तुस्थिती स्वीकारा अन् कामाला लागा. तक्रार न करता परिस्थितीवर मात करा, असे प्रेरणादायी प्रतिपादन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले
Prataprao Pawar
Prataprao Pawar esakal

नाशिक : आयुष्यात आपल्याकडे काही गोष्टी नसल्या तरी त्याची तक्रार न करता ते मिळविण्यासाठी प्रयत्न करा. वस्तुस्थिती स्वीकारा अन् कामाला लागा. तक्रार न करता परिस्थितीवर मात करा, असे प्रेरणादायी प्रतिपादन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. सकाळ समूहातील कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी (ता.९) सायंकाळी सातपूर कार्यालय प्रांगणात रंगला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगताना सकारात्मक ऊर्जेची पेरणी करत गुणवंत पाल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रसंगी सकाळ समूहाचे संचालक जयदीप माने, सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, सर-व्यवस्थापक मदनसिंग परदेशी, विकासचे सिओओ सतीश गायकवाड, व्यवस्थापक पंकज पिसोळकर (जाहिरात), बळिराम पवार (वितरण), संजय पाटील (प्रशासन), विकासचे यशवंत पाठक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पवार म्हणाले की, आई-वडील पाल्यांसाठी सर्वतोपरी त्याग करतात, कसलीही कमतरता भासू देत नाहीत. आपणही कष्ट अन् प्रामाणिकपणे काम केलं की त्यातून यश हे हमखास मिळतचं. आज एखादी गोष्ट आपल्याला छोटी वाटत असली तरी तुमच्या कष्टातून ती भव्य होणार हे नक्की. अपयश आपल्याला खूप काही शिकवते, तयारी असल्याशिवाय कधीही आखाड्यात उतरायचं नाही, असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

Prataprao Pawar
Nashik News: नांदूरशिंगोटे बसस्थानकाचे रुपडे पालटणार! नूतनीकरणासाठी 2 कोटी 11 लाख मंजूर

कार्यक्रमात पाल्यांनी आपल्या कला सादरीकरणातून अधिक रंगत आणली. मिताली पाचपांडे (नृत्य), सृष्टी चव्हाण (कविता), सिया काळे (नृत्य), दिव्या गोसावी (नृत्य), स्वरा कोतकर (कथाकथन), लक्ष्मी पवार (नृत्य), रितिका चव्हाण (गायन), मृण्मयी पठाने (नृत्य), वासंती निकम (नृत्य), तृप्ती मोरे (नृत्य) यांनी सादरीकरण करत वाहवा मिळवली.

कार्यक्रमात पहिली ते उच्चशिक्षण घेत असलेल्या पाल्यांचा सत्कार झाला. यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी यासाठी फुटबॉल तर सहावी ते उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटावे यासाठी घड्याळ रुपी पारितोषिक दिले. सिनिअर एक्झिक्युटीव रोहिणी जोशी आणि मार्केटिंग विभागाचे अशोक चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले.

Prataprao Pawar
Nashik News : वडेल चौपाटीवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार

या पाल्यांचे झाला सत्कार :
वेदांत खडके, समृद्धी पाटील, भार्गवी साळुंके, शिवराज जगदाळे, आरोही पवार, मोहित कच्छवा, जीत पवार, श्रावी चौधरी, ऋषिकेश आहिरे, दक्ष बगाडे, सोहम झिंजुडे, सृष्टी चव्हाण, आर्शीया शेख, मृण्मयी पठाणे, आयुष कुलकर्णी, श्रावणी आहेर, तनुषा ढाके, नहुष राजपूत, आराध्या मरकन, शिवनेरी महाले, मयंक पाटील, दिव्या गोसावी, सिया काळे, विघ्नेश शिंदे, इच्छा पाटील, आराध्य पवार, खुशी कोतकर, अविव्या शिंदे, तपस्वी खोडके, अनुज अमृतकर, श्रेया शिरसाट, दीपाली अमृतकर, मित्तल पाचपांडे, पार्थ सोनार, आदित्य गोडसे, प्रसंजित बगाडे, रूपेश पवार, अर्णव शिंदे, कृतिका येवले, प्रांजल साळुंखे, सुचित सातपुते, अद्वीता शिंदे, लीना देवरे, ओम पवार, चिराग राजपूत, विधी ढाके, साक्षी पवार, आदर्श चौधरी, अक्षरा चौधरी, चैतन्य शिंदे, आयुष सोनवणे, संकेत शिंदे, रितेश महाजन, गोविंद चव्हाणके, अहंत जाधव, ओम पाटील, उदय वाणी, पार्थ हिरोडकर, रिया काळे,
ध्रुव बिरारी, ह्रिषिता मोरे, अमेय कोतकर, कुशल अमृतकर, सार्थक जोशी, गार्गी रनाळकर, गौतमी रनाळकर, सुरभी शिंदे, विवेक भडांगे, प्रांजल खडके, यश शेटे, मनस्वी येवले, मिलिंद वाणी, आर्यन पवार, कस्तुरी परदेशी, हर्षदा वाणी, संस्कृती सोनार, अक्षरा ओव्हाळ, पियुष साळुंखे, स्नेहल अमृतकर, अनुष्का येवले, क्रिष्णा कापुरे, गौरी पाटील, क्रिष्णा पाटील, ऋषभ शिंदे, मानसी वाळेकर, सायली वाळेकर, समृद्धी जोशी, विनायक मोकळ, कावेरी बोरसे, कादंबरी बिरारी, प्रणव राऊत, निकीता काकळीज, रोहिणी मोकळ, तन्मय हिरोडकर, प्रणव मोरे, रोहीत पाटील, भूषण चौधरी, राही वाणी, तेजस चव्हाण, तनिष्का चव्हाण, इशा गायकवाड, आयुष येवले, तन्मय खोडके, वैष्णवी शेटे, शुभम देवरे, खुशी पाटील, सानिका पाटील, साहिल लाड, योगिता पाटील, नचिकेत चव्हाण.

Prataprao Pawar
Nashik News: सातपूर पोलीस ठाणे होणार नवीन इमारतीत स्थलांतर! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com