Nashik Kumbh Mela: नाशिकच्या कुंभमेळ्यात प्रयागराज, वाराणसी पॅटर्न! NMC अधिकाऱ्यांची सिंहस्थस्थळी भेट

A delegation of Nashik Municipal Corporation officials inspecting the works of Simhastha Kumbh Mela.'NAMO' ghat developed using gabion technology.
A delegation of Nashik Municipal Corporation officials inspecting the works of Simhastha Kumbh Mela.'NAMO' ghat developed using gabion technology.esakal

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून अभियंत्यांच्या पथकाने नुकताच उत्तर प्रदेश दौरा करून कामांची माहिती घेतली. प्रयागराज व वाराणसी धर्तीवर नाशिकमध्ये सुविधा निर्माण करून कुंभमेळा पार पाडला जाणार आहे.

मलनिस्सारण व्यवस्था, नदी स्वच्छता, घाट विकास, प्रदूषणमुक्त या कामांवर भर देवून नमामि गोदा प्रकल्पात या कामांचा प्रामुख्याने सामावेश केला जाणार आहे. (Prayagraj Varanasi Pattern in Nashiks Kumbh Mela NMC officials visit Simhasthasthala nashik news)

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार वाराणसी व प्रयागराजचा १४ ते १६ एप्रिल असा तीनदिवसीय दौरा करण्यात आला. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, बाजीराव माळी, सचिन जाधव, संदेश शिंदे यांचा पथकात समावेश होता.

२०२५ मध्ये प्रयागराज व वाराणसी येथ सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्या धर्तीवर नाशिकमधील गोदाघाटांचा विकास केला जाणार आहे. ‘नमामि गंगे’ च्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यात घाट विकास, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदी प्रदूषणमुक्त व सौंदर्यीकरणासाठी ‘नमामि गंगे’ प्रकल्प राबविला आहे. त्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रयागराज येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. तेथे उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा नाशिकमध्ये राबविल्या जातील.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

A delegation of Nashik Municipal Corporation officials inspecting the works of Simhastha Kumbh Mela.'NAMO' ghat developed using gabion technology.
Success Story : सांगवीच्या सुनीताची पोलिस दलात निवड! प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत मिळवले यश

या कामांची पाहणी

वाराणसीतील नमो घाट, मणकर्णिका घाट, राज घाट, हनुमान घाट, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मलवाहिका, मलनिस्सारण प्रकल्प, पंपिंग स्टेशनच्या यांत्रिकीकरणाची माहिती घेण्यात आली.

नदी घाट विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण, गंगा मिशनअंतर्गत मलनिस्सारण योजना, पाच किलोमीटर लांबीचा नदीघाट विकास, रस्ते विकास, उड्डाणपूल, नदी घाटापर्यंतचे प्रमुख रस्ते, साधुग्रामसाठी आनुषंगिक सेवा- सुविधा.

‘बायो टॉवर’द्वारे प्रदूषणमुक्ती

गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण करण्यात आले असून, त्यासाठी फूड चेन रिॲक्टर ‘बायो टॉवर’ विकसित करण्यात आले आहेत. मलनिस्सारण केंद्रात सांडपाण्याच्या हौदामध्ये विशिष्ट प्रकारच्या उगविण्यात आलेल्या वनस्पतींच्या माध्यमातून सांडपाणी वाहून नेले जाते.

पाण्यातील प्रदूषित घटक वनस्पतींकडून शोषले जातात. देशात पाच बायो टॉवर आहे. यातील चार उत्तर प्रदेशमध्ये, तर एक कोलकता येथे आहे.

गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर

नदी किनारी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. त्यामुळे वाराणसी येथे गॅबियन वॉल बांधण्यात आली असून नाशिकमध्ये ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत गॅबियन तंत्रज्ञानावर आधारित नमो घाट विकसित करण्याचे प्रयत्न राहणार आहे.

गंगेच्या विस्तीर्ण पात्रात बोटी चालतात. बोटींसाठी सीएनजी इंधन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारनेच नदीपात्रात तरंगते सीएनजी पंप विकसित करून दिले आहेत. प्रदूषणमुक्तीसाठी ई- ऑटो रिक्षा बंधनकारक केल्या आहेत.

A delegation of Nashik Municipal Corporation officials inspecting the works of Simhastha Kumbh Mela.'NAMO' ghat developed using gabion technology.
NMC News : दीड महिन्यात 2352 अनधिकृत फलक हटविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com