Nashik : पावसाच्‍या सरींनी सुखावले नाशिककर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nature during pre monsoon Rains

Nashik : पावसाच्‍या सरींनी सुखावले नाशिककर

नाशिक : अद्याप मॉन्‍सून (monsoon) महाराष्ट्रात दाखल झालेले नसतांना तप्त उन्‍हाचा (Heat) सामना करत असलेल्‍या नाशिककरांना पावसाची (Rain) प्रतीक्षा लागून होती. गुरुवारी (ता. ९) दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळी मॉन्‍सून पूर्व (Pre monsoon) पावसाने हजेरी लावल्‍याने नाशिककर सुखावले. पहिलाच पाऊस असल्‍याने मातीचा सुगंध सर्वदूर दरवळत होता. दरम्‍यान, पावसामुळे पारा घसरला असून, २४ अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झालेली आहे. (pre monsoon rain in city Nashik News)

यंदाचा मॉन्‍सून समाधानकारक राहणार असल्‍याचा हवामान खात्‍याने अंदाज वर्तविला होता. असे असले तरी अद्यापपर्यंत मॉन्‍सून महाराष्ट्रात दाखल झालेले नसल्‍याने हवामान खात्‍याने स्‍पष्ट केलेले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नाशिककर उकाड्याने बेजार झालेले असताना हवेतील आद्रता वाढल्‍याने उकाड्यात भर पडली होती. गुरुवारी सकाळपासून तप्त उन्‍हाच्‍या झळा असह्य झालेल्या असताना सायंकाळनंतर मात्र आकाशात ढग दाटण्यास सुरवात झाली. सहाच्‍या सुमारास शहरासह उपनगरी भागांमध्ये मॉन्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाच्‍या हलक्‍या सरी बरसल्‍या. यंदाचा हा पहिलाच पाऊस असल्‍याने अनेकांनी भिजत या पावसाचा आनंद साजरा केला. दरम्‍यान, पावसाच्‍या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्‍याने उष्णतेपासून नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. येत्‍या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: Nashik : जिल्हा परिषदेच्या 100 कोटींच्या निधी वर संक्रांत

पुढील तीन दिवस पावसाची शक्‍यता

पुढील दोन ते तीन दिवस हलक्‍या व मध्यम स्‍वरुपातील पावसाच्‍या सरी बरसण्याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. काही ठिकाणी जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाच्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: अबब! कोंबड्याच्या खुराड्यात चक्क कोब्रा घुसला अन्...

Web Title: Pre Monsoon Rain In City Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikrainMonsoon Rain
go to top