गर्भवती महिलांमधील रक्तक्षय

गर्भवती महिलांमधील रक्तक्षय
Published on: 
ॲंकर शहर-जिल्हा टुडे पान एकसाठी -------------------- (समर्पक छायाचित्र वापरता येईल) --------- जिल्ह्यातील ३१८ गर्भवतींना मध्यम रक्तक्षय ------- आरोग्‍य विभागाकडून तपासणी; तिसऱ्या त्रैमासिकांतील २१६ महिलांचा समावेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : जिल्ह्यात गर्भवती महिलांमधील रक्तक्षयाची समस्या कायम असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीतून समोर आले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाकडून १७ ते ३० सप्टेंबरदरम्यान ग्रामीण भागातील दुसऱ्या व तिसऱ्या त्रैमासिकांतील गर्भवतींची तपासणी करण्यात आली. यात ३१८ महिलांमध्ये मध्यम स्वरूपाचा रक्तक्षय आढळून आला. यापैकी अनेक महिलांवर फेरिक कार्बोक्सिमाल्टोज व आयर्न सुक्रोजच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले आहेत. गर्भावस्थेतील रक्तक्षयामुळे आईच्या आरोग्यावर व गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी नियमित हिमोग्लोबिन तपासणी करून घेणे व रक्तक्षय आढळल्यास वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेमार्फत गर्भवतींची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार उपलब्ध करून देण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. याअनुषंगाने सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या पंधरवाड्यात आरोग्‍य विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी वेळेत उपचार करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तिसऱ्या त्रैमासिकांत २१६ महिला तिसऱ्या त्रैमासिकांत हिमोग्लोबिनची पातळी ९.९ ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या २१६ गर्भवती आढळल्या. यापैकी ११५ महिलांना फेरिक कार्बोक्सीमाल्टोज, तर १०१ महिलांना आयर्न सुक्रोज उपचार देण्यात आले आहेत. दुसऱ्या त्रैमासिकांत हिमोग्लोबिन ९.४ ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या १०२ गर्भवतींची नोंद झाली. त्यापैकी ६१ महिलांवर फेरिक कार्बोक्सीमाल्टोज, तर ४१ महिलांवर आयर्न सुक्रोजच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. ८१ गर्भवतींत गंभीर रक्तक्षय दरम्यान, हिमोग्लोबिनची पातळी ७ ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या ८१ गर्भवती महिलांमध्ये गंभीर रक्तक्षय आढळून आला. यामध्ये ३० महिलांना फेरिक कार्बोक्सीमाल्टोज, तर ५१ महिलांना आयर्न सुक्रोज उपचार देण्यात आले आहेत. गंभीर रक्तक्षय असलेल्या गर्भवतींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने त्यांची नियमित तपासणी व उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. ---------- इन्‍फो पारोळा, रावेरमध्ये सर्वाधिक तिसऱ्या त्रैमासिकांतील मध्यम रक्तक्षयाच्या प्रकरणांमध्ये पारोळा व रावेर तालुक्‍यांत सर्वाधिक म्‍हणजे ३७ गर्भवती महिला आढळून आल्‍यात. तर जळगाव तालुक्यात २६, भडगाव २७, यावल २४ व अमळनेर तालुक्यात २१ गर्भवतींची नोंद झाली आहे. गंभीर रक्तक्षयाच्या प्रकरणांत जामनेर तालुक्यात २३, पारोळ्यात १२, मुक्ताईनगर ९ व यावल तालुक्यात सात प्रकरणे आढळली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com