Nashik News : शाळाशाळांमध्ये स्नेहसंमेलनाची तयारी; 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणार कार्यक्रम

Annual Function
Annual Functionesakal

अभोणा (जि. नाशिक) : शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयातील गोड आठवणींपैकी एक आठवण म्हणजे 'वार्षिक स्नेहसंमेलन'. शैक्षणिक वर्षात दिवाळीची सुट्टी संपली की, स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागतात. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

त्यात प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे सहभागी झालेला असतो. तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे सावट कमी होऊन निर्बंधमुक्त वातावरण असल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली आहे. (Preparations for annual functions in schools after 2 years of corona nashik news)

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा,महाविद्यालय बंद असल्याने, स्नेहसंमेलन साजरे करता आले नाहीत. मात्र या वर्षी तशी परिस्थिती नसल्याने, जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची धूम सुरू झाल्याचे पहावयास मिळते. साधारणपणे डिसेंबर,जानेवारी या महिन्यातच स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही अशा कार्यक्रमांची विद्यार्थी, पालक यांना उत्सुकता असते. नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक करंडक स्पर्धेमुळे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळेही वातावरण निर्मिती झालीच आहे.

येथील परिसरातील सर्वच शाळा महाविद्यालयात वाद्य आणि गीतांचा आवाज ऐकू येतो. विविध वेशभूषा व साहित्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग दिसून येत आहे. संमेलनाचे कार्यक्रम साधारणतः दोन-तीन दिवस चालतात. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर तयारी केली जात असते. संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी अनेक नव्या गोष्टी शिकतात.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Annual Function
Nashik News : सटाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संमेलनातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे समूहनृत्य, विद्यार्थ्यांनी बसवलेली नाटिका. त्यासाठी पात्रांची निवड, त्यांची चालणारी तालीम तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वैयक्तिक, समूह गायन, नृत्य, प्रश्नमंजूषा, शेला पागोटा, फनी गेम्स, आनंदमेळा, विविध क्रीडास्पर्धा, प्रदर्शन या सर्व गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. याशिवाय शहरी भागात नाटक, एकांकिका असे कार्यक्रम आयोजित करून विविध पारितोषिके दिली जातात.

विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्याचे सादरीकरण बघण्यासाठी आवर्जून अशा स्नेहसंमेलनाला हजेरी लावतात.विशेषतः बालवाडी,इंग्लिश मिडीयम स्कुल यावर्गातील पाल्यांचे पालक मोठया हौशीने खर्च करतात.

पाल्य पहिल्यांदाच स्टेजवर जाणार,याचं वेगळंच अप्रूप पालकांना असतं.दहावी,बारावीच्या परीक्षेपूर्वी आधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते. मनासारखे छंद पूर्ण झाल्याने येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक 'पर्वणी' च असते.

Annual Function
Dada Bhuse | नाशिक येथे उभी राहणार मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था : दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com