मालेगाव- रावळगाव (ता. मालेगाव) येथील साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची लगीनघाई आतापासूनच सुरु आहे. साखर उद्योगातील रावळगाव हा खासगी क्षेत्रामधील देशातील पहिला कारखाना आहे. एस.जे. शुगर पॉवर अँड डिस्टलरी प्रा. लि. रावळगाव हा कारखाना मे. स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि.या कंपनीने विकत घेतला आहे. साखरेबरोबरच डिस्टलरी, इथेनॉल, खत प्रकल्प, वीज प्रकल्प तसेच इतर बाय प्रॉडक्ट सुरु करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी दिली.