पान-२
----------------
NSK26H34088
ओझर ः कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शनिवारी येथील विमानतळावर आगमनप्रसंगी स्वागत करताना राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा.शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
-----------------
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे
राज्यपालांकडून स्वागत
उपमुख्यमंत्री शिंदे, पवार यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ ः नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शनिवारी (ता.३१) सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर राजकीय, प्रशासकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
ओझर विमानतळावर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. प्रशासकीय व लष्करी अधिकाऱ्यांमध्ये जलसंपदा सचिव एकनाथ डवले, अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिरकुमार पात्रा, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एन. एस. सराना, एअर कमांडर विक्रम सिंग आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा समावेश होता. ओझर येथून राष्ट्रपतींचा ताफा थेट रामतीर्थाकडे रवाना झाला. १२ वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण झाले.
---------------