राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट
Published on: 
राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट सुरक्षा यंत्रणांकडून हेलिकॉप्टर उड्डाणाला बंदी; रस्तेमार्ग प्रवास शक्य सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (ता.३१) नाशिकमध्ये येणार आहेत. या दौऱ्यावेळी पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रपतींना हॅलिकॉप्टरने प्रवासास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती नाशिक व त्र्यंबकेश्‍वरचा प्रवास आता वाहनाने करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३१) नाशिकमध्ये सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्‍वर मंदिराला भेट देणार असून मंदिर व कुशावर्त तीर्थ येथे त्यांच्या हस्ते पूजन होईल. यासर्व दौऱ्याप्रसंगी राष्ट्रपती नाशिक विमानतळ ते महाराष्ट्र पोलिस अकादमी तसेच पोलिस अकादमी ते त्र्यंबकेश्‍वर परत नाशिक असा हेलिकॉप्टरचा प्रवास करणार होत्या. महसूल, पोलिस विभाग तसेच सुरक्षा यंत्रणा त्यादृष्टीने मागील चार दिवसांपासून दौऱ्याची आखणी करत आहेत. या तयारीचा भाग म्हणून नाशिक विमानतळ ते पंचवटीतील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्‍वर शहरात रंगीत तालीम पार पडल्या. मात्र, पावसाच्या अंदाजामुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर उड्डाणावर मर्यादा आल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळामुळे नाशिकसह राज्यात विविध जिल्ह्यात २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रपतींना नाशिकमध्ये दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर वापरावर मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रपती आता विमानतळ ते नाशिक शहर तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर या संपूर्ण प्रवासात वाहनाने प्रवास करतील. दौऱ्यात ऐनवेळी बदल करावा लागल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. --- पोलिसांचे फेरनियोजन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रस्तेमार्गे प्रवास करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. परिणामी संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करावी लागेल. राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सुरक्षित हालचालींसाठी मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग, वाहतुकीतील बदल आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे. तसेच ताफा ज्या मार्गाने प्रवास करणार आहे, त्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक डागडुजीचे काम तातडीने हाती घ्यावे लागेल. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com