पंचवटीतील वाहतूक नियमनासाठी ७०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा

पंचवटीतील वाहतूक नियमनासाठी ७०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा
Published on: 
राष्ट्रपती दौऱ्याची ७०० वाहतूक पोलिसांवर जबाबदारी ध्वजारोहणासाठी फौजफाटा; राज्य महामार्ग पोलिसांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कुंभमेळ्याचे शनिवारी (ता.३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. संपूर्ण दिवसभर राष्ट्रपती नाशिकमध्ये असल्याने या दौऱ्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी राज्य महामार्ग पोलिसांसह परजिल्ह्यातील वाहतूक विभागांचे सुमारे ७०० पोलिस अधिकारी व अंमलदार वाहतूक नियमनासाठी शहरात दाखल होणार आहेत. ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रपती मुर्मू या प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर दिला आहे. राष्ट्रपतींसह राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त माधव रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यासाठी राज्य वाहतूक पोलिस दलासह परजिल्ह्यातील वाहतूक शाखांचे ७०० आणि शहर वाहतूक शाखेचे सुमारे १९० असा जवळपास एक हजार वाहतूक पोलिस अधिकारी-अंमलदारही तैनात केले जाणार आहेत. ..... ​राष्ट्रपतींचा असा असेल दौरा -राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे सकाळी ९ च्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन होईल -ओझर येथून हॅलिकॉप्टरने महाराष्ट्र पोलीस अकादमीत राष्ट्रपती दाखल होतील -राष्ट्रपती ११ च्या सुमारास मोटारीने महाराष्ट्र पोलीस अकादमीकडून गोदाघाटाकडे प्रयाण करतील -रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळ्यानंतर मोटारीने महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल होणार -महाराष्ट्र पोलीस अकादमीतून राष्ट्रपती हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला जाणार -त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शन आणि हॅलिकॉप्टरने पुन्हा अकादमीत परततील. -राष्ट्रपती सायंकाळी पाचला पुन्हा मोटारीने गोदाघाटावर येऊन गोदाआरतीत सहभागी होतील. -गोदाघाटावरुन मोटारने ओझर विमानतळ व तेथून दिल्लीसाठी रवाना होतील. .......... वीसपेक्षा अधिक रस्ते बंद - शुक्रवारी (ता. ३०) ध्वज मिरवणुकीसाठी बंद रस्ते : अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट, मालेगाव स्टॅन्ड ते मखमलाबाद नाका, दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड आणि मिरवणूक मार्गाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग. - शनिवारी (ता. ३१) ध्वजारोहण : अशोकस्तंभ ते दिंडोरी नाका, मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅन्ड, कपालेश्वर मंदिर ते गौरी पटांगण, पंचवटी कारंजा ते रामतीर्थ, शनी चौक ते रामतीर्थ, गाडगे महाराज पुल, रामसेतू पुल वाहतुकीसाठी बंद, गोंधळ गेट (म्हसोबा मंदिर) ते पेठ फाटा हे रस्ते वाहतुकीसाठी बंद - शनिवार (ता. ३१) गोदाआरती : एकमुखी दत्तमंदिर ते रोकडोबा मैदान (नागरिकांसाठी प्रवेश बंद), गुरांचा दवाखाना ते घारपुरे घाट ते एकमुखी दत्तमंदिर, अशोकस्तंभ ते रविवारी कारंजा ते भांडी बाजार ते बालाजी मंदिर, धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक ते दिल्ली दरवाजा, रविवार कारंजा ते मेनरोड ते धुमाळ पॉईंट, गाडगे महाराज पुल व रामसेतू पुल वाहतुकीसाठी बंद, रविवार कारंजा ते दिंडोरी नाका, मखमलाबाद नाका ते सरदार चौक, रामतीर्थ ते पंचवटी कारंजा, चिंचबनाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणार- येणारा रस्ता बंद, शालिमार ते नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा ते साक्षी गणपती ते घाटाकडे जाणार-येणारा रस्ता बंद .............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com