नाशिक- जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा ठरला. ग्राहकाच्या अभावामुळे या सप्ताहात तेलाच्या भावात दोन ते तीन रुपये लिटर मागे मंदी आली होती, मात्र सणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात तेजीचे वातावरण निर्माण झाले. डाळी साळींच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.