नाशिकच्या स्वयमला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार, मोदींशी संवाद साधण्याची संधी

पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आज संधी शक्य
SWAYAM PATIL
SWAYAM PATILSAKAL

इंदिरानगर : राणेनगर येथील रहिवासी व आठवीचा विद्यार्थी आणि डाउन सिंड्रोमसारख्या आजारावर मात करून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदविणारा जलतरणपटू स्वयम पाटील याला यंदाचा प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी अकराला त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधीदेखील मिळण्याची शक्यता आहे.

SWAYAM PATIL
जळगाव ग्रामीण भागात शाळा सुरू : महापालिका क्षेत्रातील शाळा बंदच

स्वयमला क्रीडा क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील विविध गटांत इतर बालकांना प्रेरणादायी ठरतील अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. शारीरिक व्याधींवर मात करत स्वयमने फुलविलेल्या जलतरणातील देदीप्यमान कारकीर्दीबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे. यापूर्वीदेखील त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ३ डिसेंबर २०१८ ला त्याला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आई विद्या आणि वडील मिलिंद पाटील यांनी स्वयमच्या आजाराचे दुःख न बाळगता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जलतरणपटू घडवून दाखविले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पुरस्कारप्राप्त बालकांशी संवाद साधणार आहेत. त्यात कदाचित स्वयम‌चाही समावेश असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही सगळी व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते. दूरदर्शनवर दुपारी एकपर्यंत हा सोहळा लाइव्ह असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com