Nashik : अनुदान जमा करा, अन्यथा सातबाऱ्यावर बोजा

pm kisan yojana
pm kisan yojana sakal

येवला (जि. नाशिक) : तालुक्यात तब्बल १२८३ अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा (Prime Minister Kisan Yojana) लाभ घेतला आहे.यातील ५१६ लाभार्थ्यांनी घेतलेले अनुदान शासनाला परत केले आहे.मात्र अद्यापही ७६७ लाभार्थी शासनाच्या सूचनेला केराची टोपली दाखवत आहेत. तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून मिळालेल्या लाभाची रक्कम शासनास जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली असून संबंधितांनी या रकमेचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. या रकमेचा भरणा न केल्यास सातबारा (Satbara) उताऱ्यावर बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही हिले यांनी दिला आहे. (Prime Minister Kisan Yojana Nashik News)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 पासून अंमलबजावणी सुरु असून दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी आहेत. प्रतिवर्ष सहा हजार रुपये (दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात) दिली जाते.या योजनेचा आजी-माजी मंत्री,खासदार,आमदार, महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष,केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून),गेल्या वर्षात प्राप्तिकर भरलेल्या व्यक्ती, मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीनोंदणीकृत डॉक्‍टर, वकील,अभियंता,सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदींना लाभ घेता येणार नाही.

असे असतानाही या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा - बायको दोघेही नोकरीला असणाऱ्यांकडून घेण्यात आला होता.आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली.त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यांनी भरावयाच्या रकमेसह यादी निश्चित केली आहे.

pm kisan yojana
Nashik : ओतुरची ऐतिहासिक बारव पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

येवला तालुक्यात प्रधानमंत्री किसान योजनेसाठी अपात्र असतांनाही संबधित शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती चुकीची भरल्यामुळे शासनाने आयकर भरणाऱ्या ७०६ लाभार्थी व अन्य इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या अशा एकुण ५७७ लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे.सर्व अपात्र लाभार्थ्यांना तहसील कार्यालया मार्फत नोटीस देण्यात आल्या आहे. इन्कमटॅक्स भरणारे ७०६ अपात्र खातेदारापैकी ४४२ व इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या ५७७ पैकी ७४ लाभाथ्यांनी शासनास रक्कम परत केली आहे. सर्व अपात्र लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे

pm kisan yojana
नाशिक : मजुर टंचाईवर मात करण्यासाठी टोकन यंत्राची मदत

सात दिवसात कारवाई होणार

रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्याची कार्यवाही केली जाईल. अपात्र लाभार्थ्यांची यादी तालुक्यातील सर्व संबधित तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.ज्यांच्याकड़े प्रलंबित असलेली योजनाची रक्कम शासनास भरणा करून सहकार्यं करावे. अन्यथा पुढील सात दिवसात सातबारा उता-यावर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असे तहसीलदार हिले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com