
‘सिव्हिल’मध्ये केसपेपर वितरण करतोय खासगी व्यक्ती
नाशिक : जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना केसपेपर दिला जातो, त्याची नोंद केली जाते. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी नसताना खासगी व्यक्ती ते काम करीत असल्याचे निदर्शनास आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. (Private individuals are distributing case papers in Civil nashik Latest Marathi news)
हेही वाचा: ‘त्या’ शिक्षकावर कारवाई करा : सायली पालखेडकर
जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण कक्षाच्या निर्धारित वेळेतील कामकाज संपल्यानंतर मुख्य इमारतीत येणाऱ्या रुग्णांना केसपेपर देऊन आपत्कालीन कक्षाकडे रुग्णाला पाठविले जाते. जिल्हा रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण येतात.
केसपेपरसाठी दहा रुपये शुल्क आकरले जाते. त्यामुळे या ठिकाणी लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते. दरम्यान, सध्या मनुष्यबळाची कमतरता असल्याने लिपिकाऐवजी अनेकदा वर्ग चारच्या कर्मचाऱ्याकडे हे काम दिले जाते. मात्र, सध्या ज्या कर्मचाऱ्यांची याठिकाणी नियुक्ती केली आहे, ती अशिक्षित आहे.
त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने एका खासगी व्यक्तीला केसपेपर लिहिण्यासाठी बसविल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील चर्चा ‘सिव्हिल’च्या आवारात होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होत आहे.
"असे काही होणार नाही. तरीही यासंदर्भात चौकशी केली जाईल."
-डॉ. उत्कर्ष दुधेडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय
हेही वाचा: GST चुकवेगिरी प्रकरणी एकाला अटक; 85 कोटींची बनावट बिले
Web Title: Private Individuals Are Distributing Case Papers In Civil Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..