Yeola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मिळाले खासगी टँकर

मागणी २७ फेब्रुवारीला, पाहणी १० मार्चला अन्‌ टँकर सुरू ९ एप्रिलला... अशा गर्दीत अडकलेले तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचे टँकर अखेर बुधवार पासून सुरू झाले आहेत.
Yeola News
Yeola Newssakal
Updated on

येवला- मागणी २७ फेब्रुवारीला, पाहणी १० मार्चला अन्‌ टँकर सुरू ९ एप्रिलला... अशा गर्दीत अडकलेले तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचे टँकर अखेर बुधवार (ता.९) पासून सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने अगोदर शासकीय टँकर मंजूर केले होते, मात्र त्यासाठी डिझेलला पैशाची तरतूदच नसल्याने येथील प्रशासनाने खासगी टँकरची मागणी केली होती. अखेर ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्याने आजपासून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com