
Nashik News : प्रियांका मोहिते हिची मुख्यमंत्र्यांसमवेत संसद अभ्यास दौऱ्यात निवड!
नरकोळ (जि. नाशिक) : पिंगळवाडे (ता.बागलाण) येथील दिवंगत बाजीराव साळवे यांची भाची व येवला येथील माध्यमिक शिक्षक सुरेश मोहिते व उज्वला मोहिते यांची कन्या प्रियांका सुरेश मोहिते व इतरत्र विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठअंतर्गत राज्यशास्त्र आंतरराज्य संबंध या विषयांतर्गत संसदीय अभ्यास दौरा निमित्ताने नागपूर हिवाळी अधिवेशनात निमित्ताने निवड करण्यात आली आहे. (Priyanka Mohite selected for Parliament Study Tour with CM eknath shinde Nashik News)
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
हेही वाचा: Nashik News : वीर जवान सारंग अहिरे अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर
अभ्यास दौरा साधारण आठ दिवसांचा असून, या दौऱ्यात विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात तीन मुले, तीन मुली दौऱ्यात समाविष्ट आहेत. या अभ्यास दौऱ्यात या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार लाभले. त्यात अर्थकारण, राजकारण व राष्ट्रीय राजकारण या विषयांचे मार्गदर्शन मिळाले.
हा अभ्यास दौऱ्याचे हे ४९ वर्ष असून यात महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, निलम गोऱ्हे, बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. तसेच, विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत. विधान मंडळ सचिव सुनील झोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक त्यांच्या विद्यालयाच्या प्रा. श्रीरंजन आवटे हे आहेत.
या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विशेष उपस्थिती दर्शविली व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रियांका मोहिते यांच्या निवडीने पिंगळवाडे परिसरात कौतुक केले जात आहे. या अभ्यासाचे निमित्ताने विधान भवन नागपूर परिसरात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले होते. प्रियांका मोहिते हिने आभार मानले.
हेही वाचा: Nashik News : इंधन टँकरची रस्त्यावर पार्किंग! अपघाताचा धोका, कंपनीचे पोलिसांकडे बोट