Agriculture News: ओसाड माळरानावर विषमुक्त हळदीचे उत्पादन; 10 गुंठे क्षेत्रात साडेतीन टन उत्पादन

Agriculture news
Agriculture newsesakal

सिन्नर : खासगी कंपनीची नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतीसाठी गावाची वाट धरलेल्या महेश खाटेकर या युवा शेतकऱ्याने विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीचा प्रयोग आपल्या शेतात यशस्वी केला आहे.

वावी येथे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत यशस्वीपणे हळद लागवड करतानाच अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात तब्बल साडेतीन टन उत्पादन घेण्याची किमया श्री. खाटेकर यांनी साधली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या या हळदीची पावडर बनवून गेल्या चार वर्षांपासून ती हातोहात विक्रीही ते करीत आहेत.

Agriculture news
Agricultural News : शेतमाल आज विकला, उद्या भाव वाढला तर

सिन्नर तालुक्याचा पूर्व भागाला गेल्या चार- पाच वर्षात पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वडिलांच्या वाट्याला आलेली चार एकर शेती कसण्यासाठी खासगी नोकरी सोडून आई, पत्नी व दोन मुलांसोबत महेश खाटेकर शेतातच वस्तीला आले. सुरुवातीपासूनच नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे त्यांचा कल होता.

नैसर्गिक शेतीतज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी पारंपरिक बाजरी, ज्वारी या पिकांसह कडधान्य उत्पादन घेणे सुरू केले. विहिर व बोअरवेलला चांगले पाणी लागल्याने त्यांनी गहू, कांदा देखील पिकवला.

Agriculture news
Agriculture News: खामखेड्यात पांढऱ्या टरबुजाचे यशस्वी उत्पादन; 75 दिवसात दीड लाखाचा फायदा

नंतर सुरुवातीला पाच गुंठे जागेत त्यांनी सेलम जातीच्या हळदीची लागवड केली. भरघोस उत्पादन मिळाल्यावर गेली सहा वर्षे ते शेतात जागा बदलत दहा गुंठे क्षेत्रात हळद लागवड करत आहेत. वावीच्या ओसाड माळरानावर हळद लागवडीचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग म्हणावा लागेल. गेल्या हंगामात त्यांनी तब्बल साडेतीन टन उत्पादन घेतले.

ही हळद नैसर्गिक पद्धतीने वाळवून त्यापासून 400 किलो हळद पावडर बनवली. त्यासाठी घरातच चक्की बसवली आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता हळद पावडर ते बनवतात. हळदीच्या पिकात आंतरपीक म्हणून दोन क्विंटल तूरडाळीचे उत्पादन झाले. ४० हजार रुपयांची हिरवी मिरची देखील बाजारात विकली.

Agriculture news
Agriculture News: वांग्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने केले मोफत वाटप

कडधान्यही नैसर्गिक पध्दतीने

हळदाबरोबरच श्री. खाटेकर यांनी नैसर्गिक पद्धतीने कडधान्य उत्पादनावर भर दिला आहे. विविध प्रकारच्या डाळी ते स्वतः उत्पादित करतात. रसायनमुक्त पद्धतीने पिकवलेल्या कांद्याचा कीस देखील त्यांच्याकडे विक्रीला आहे.

शासनाच्या मिलेट प्रकल्पात सहभागी होण्याचा त्यांचा मानस असून बाजरी, ज्वारी, नाचणीचे नैसर्गिक उत्पादन घेऊन त्यापासून विविध पदार्थ बनवून विकण्याची त्यांची संकल्पना आहे. बन्सी या गव्हाच्या वाणाची ते सुरुवातीपासून लागवड करतात. साठ रुपये किलो दर या गव्हाला मिळतोय. देवठाण बाजरी, सातारी आले देखील ते पिकवतात.

Agriculture news
Farmers Long March: अखेर लाल वादळ शमलं! सरकारच्या आश्वसनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित

सेंद्रीय गुळाचे उत्पादन

दहा गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या उसाचे सोळा महिन्यात २६ टन उत्पादन मिळाले. ठिबकमुळे पाणी बचत करून श्री. खाटेकर यांनी ऊस लागवड यशस्वी केली. त्यासाठी नैसर्गिक खते वापरली. या उसापासून सुमारे २२०० किलो सेंद्रीय गूळ स्वतः बनवून घेतला. गेले वर्षभर यापैकी १८०० किलो गूळ विक्री झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com