kailash pangavhane
sakal
निफाड - तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री. कैलाश यादवराव पानगव्हाणे (वय अंदाजे ४५ वर्षे) यांनी आज सकाळी आपल्या द्राक्षबागेत विष प्राशन करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे उगाव व परिसरात शोककळा पसरली असून, एक प्रगतिशील शेतकरी गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.