Nashik Crime News : वडाळागावात 17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांना अटक

Crime News
Crime Newsesakal

Nashik News : राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही वडाळागावात साठा करून ठेवण्यात आलेला सुमारे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा इंदिरानगर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर चौथा संशयित पसार झाला आहे.

वडाळागाव परिसरातील सेंट सादिक स्कुलजवळ असलेल्या रो हाऊसच्या मागे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची गोपनीय खबर इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. (Prohibited Gutkha worth 17 lakh seized in Wadala Gaon Three arrested Indiranagar police action Nashik Crime News)

त्यानुसार सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांना दिल्यानंतर गेल्या रविवारी (ता. ४) रात्रीपासून पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचला होता.

मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, १७ लाख १५ हजार ६२५ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली.

रोहन अन्वर शेख (रा. वडाळागाव), शोएब इकबाल पटेल (३३, रा. आलिशान सोसायटी, वडाळागाव), मोहमद गुफरान कुतुबुद्दीन खान (२२, रा. दरबार स्टड फार्म, वडाळागाव. मूळ रा. इटियाथोक, जि. गोंडा, उत्तरप्रदेश) यांना अटक केली आहे तर असद जाकीर सय्यद (२५, रा. दरबार घोड्याचा तबेला, वडाळागाव) याचा पोलीस शोध घेत आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक बोंडे हे करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime News: '...म्हणून मी जगाचा निरोप घेतोय', सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com