Nashik : 15 दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prohibition order

Nashik : 15 दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, दहिहंडी, श्रावणमास, पारशी धर्माचे नूतन वर्ष आदी सण, महोत्सवाच्या पाश्‍र्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात शुक्रवार (ता. १२) मध्यरात्रीपासून ते २६ ऑगस्टपर्यंत पुढील पंधरा दिवसांसाठी मनाई आदेश लागू केला आहे. (Prohibitory orders imposed in city for 15 days Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: ‘रिपॅकिंग’च्या नावे खाद्यतेलात भेसळ; आर्थिक फायद्यासाठी आरोग्याशी खेळ

मंगळवारी (ता. १५) स्वातंत्र्यास ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होणार आहे. बुधवारी (ता. १६) पारशी धर्माचे नूतन वर्ष आणि गुरुवारी (ता. १८) कृष्णजन्मोत्सव, गोपाळकाला आहे.

यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून २६ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बागळता येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही.

आरडाओरड, वाद्य वाजविण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी आहे.

पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.

हेही वाचा: गरिबांना लुटा अन श्रीमंतांना वाटा, हेच भाजपचे धोरण : नाना पटोले

Web Title: Prohibitory Orders Imposed In City For 15 Days Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..