Nashik Political News: भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आश्वासनांची पेरणी! निवडणुकीची तयारी सुरू

पवारांचे पायाभूत सुविधा, तर फडणवीसांचे शेतीला बळ
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawaresakal

Nashik Political News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाशिक शहर व जिल्हा केंद्रभागी मानून विकासाचे मॉडेल नाशिककरांसमोर मांडण्याचा प्रयत्न झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शहर केंद्रित प्रश्नांचा ऊहापोह करताना शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. तर, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मेट्रो निओची तार छेडताना ग्रामीण भागातील म्हणजे शेतकऱ्यांना ॲग्री बिझनेसचे स्वप्न दाखविण्यात आले.

विकासकामांचे आश्वासन देत असताना त्या पूर्ण होणेदेखील अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भाषणातून नाशिकमध्ये आश्वासनांची पेरणी करून लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे यानिमित्ताने मानले जात आहे. (promises from BJP NCP Preparations for election underway at shasan aplya dari maharashtra politics Nashik News)

तंत्रज्ञानाचे प्रमाणिकरण

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेअंतर्गत नाशिकला मेट्रो निओ प्रकल्प त्यांनी दिला. २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणादेखील झाली, परंतु अद्यापपर्यंत प्रकल्प पूर्ण झाला नाही.

मध्यंतरीच्या काळात दोन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.

त्यानंतर चार महिने उलटले तरी प्रकल्प होत नसल्याने नाशिककरांमधील नाराजी असल्याचा अंदाज घेऊन फडणवीस यांनी मेट्रो निओला उशीर होत असल्याचे सांगताना ट्रान्स्पोर्टचे मॉडेल तयार झाले असून तंत्रज्ञानाचे प्रमाणिकरण सुरू असल्याची माहिती दिली. मेट्रो संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sakal Survey: लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्यास एकाच पक्षाला मत देणार का? जनतेनं सांगितला Voting Pattern

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

- तीन वर्षांत नाशिकच्या प्रत्येक शेतकऱ्याला बारा तास वीज.

- पन्नास टक्के शेतकऱ्यांची वीज लवकर.

- विजेसाठी पंधरा ऑगस्टपर्यंत निविदा.

- नाशिकच्या आधुनिक शेतीला प्राधान्य.

- वर्ल्ड बँकेच्या मदतीने शेतीचा स्मार्ट प्रकल्प.

- दहा हजार गावांमध्ये ऍग्री बिझनेस सोसायटी त्याला गोल्ड चेन.

- ४३ कॉर्पोरेट सोबत या ऍग्री बिझनेस सोसायटीचा करार.

- गावातील सोसायटी शेतकऱ्यांचा माल थेट विकणार.

- वेअर हाउसिंग व तारण योजना.

- पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणार.

- नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद कायमचा मिटविणार.

- नाशिक- पुणे रेल्वेचा निर्णय लवकरच.

- कुंभमेळ्याच्या निमित्ताने कॉरिडॉर.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sakal Survey : 'एकला चलो रे' म्हणणाऱ्या राज ठाकरेंची जादू 2024मध्ये तरी चालणार का?

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले

- गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करू.

- झोपडपट्टीमुक्त नाशिकला प्राधान्य.

- नाशिकच्या विकासाला निधी कमी पडणार नाही.

- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणार.

- ओझर विमानतळ पूर्ण क्षमेतेने चालविण्यासाठी प्रयत्न.

- गावठाण क्लस्टर योजनेला गती देवू.

- शहरात एसआरए स्कीम लागू करणार.

- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड.

- शहर पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र निधी.

- शहराचा वाहतूक आराखडा तयार करणार.

- समृद्धी महामार्गाच्या कामाला गती देणार.

- जिल्हा बॅंकेला अडचणीतून काढू.

- पायाभूत सुविधांचे जाळे तयार करू

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sakal Survey : गाजावाजा करत महाराष्ट्रात एंट्री! BRS खरंच चमत्कार करणार? सर्व्हेत जनता म्हणते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com