Nashik: ग्रंथालय व्यवहाराला मिळावी चालना; बौद्धिक दर्जा उंचाविण्यासाठी चर्चासत्र, व्याख्यानांसाठी असावी तरतूद

libraries
librariesesakal

Nashik News : शासकीय, निमशासकीय, व्यापार, अर्थविषयक सर्व व्यवहार मराठी भाषेतून व्हावे, त्यामुळे भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल. शिक्षण मराठीतून असावे, हा आग्रह अनेक वर्षांपासूनचा आहे.

शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालयांना अनुदान दिल्यास ग्रंथ खरेदी होऊ शकते. ग्रंथ व्यवहाराला चालना मिळावी, अशी आशा सांस्कृतिक धोरणातील भाषा, साहित्य आणि ग्रंथ व्यवहार व वाचन संस्कृती उपसमितीकडून असेल, असे ज्येष्ठ साहित्यिकांचे मत आहे. (Promotion of library business Provision should be made for seminars lectures to raise intellectual standard Nashik)

मराठीतीतील विविध बोलींमुळे प्रमाण मराठी समृद्ध होते. त्या बोलींचा वापर करून वाकप्रचार, संदर्भ यांचा परिचय होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा बोलीभाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन समृद्ध होऊ शकतो.

बौद्धिक दर्जा उंचाविण्यासाठी चर्चासत्र, व्याख्यानांसाठी सांस्कृतिक विभागाच्या बजेटमध्ये तरतूद असावी.

मराठीतीतील वेगवेगळ्या भागातील साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट केले तर तेथील संस्कृती, रीती याचा परिचय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल. ग्रंथ व्यवहाराला चालना देण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन लावावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

libraries
Jalgaon News: दिव्यांगांना मिळणार वैश्‍विक ओळखपत्र; ऑनलाईन अर्ज करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

साहित्यातील अंतरंग उलगडावे

मराठीतीतील ग्रंथसंपदेची विविध चर्चासत्र, व्याख्यानांमधून वाचकांना ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाचकांना साहित्यातील अंतरंग ओळखल्यास चर्चासत्र, व्याख्यानांमधून वाचनाची गोडी लागू शकते. त्यांच्यात बौध्यिक दर्जा उंचाविण्यासाठी मदत होऊ शकते.

"वाचनालयांनी विविध चर्चासत्रे ठेवल्यास ग्रंथ वाचण्यासाठी वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ शकते. भाषा, साहित्य, ग्रंथव्यवहार एकाच बाबीशी निगडित आहे. आकाशवाणीवर काही ग्रंथाचे वाचन होते, ते प्रसारमाध्यमे दूरदर्शनवर झाल्यास साहित्यातील अंतरंग उलगडण्यात मदत मिळणार आहे. वाचकांना साहित्याचे वाचन शक्य नाही. त्यांना ग्रंथाचा अंतरंग कळण्यास मदत मिळणार आहे." - दिलीप धोंडगे, ज्येष्ठ साहित्यिक

"गाव तिथे ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, ग्रंथालय सेवकांना आर्थिक अनुदान देणे तसेच बौद्धिक दर्जा उंचाविण्यासाठी चर्चासत्र, व्याख्यानांसाठी बजेटमध्ये तरतूद असावी. पीपल कनेक्ट, पार्टिसिपेशन असावे." - रमेश वरखेडे, ज्येष्ठ साहित्यिक

libraries
Nashik News: पंचवटीत अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट! सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांना त्रास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com