NMC News : ढोल बजाव मोहिमेत तिसऱ्यादिवशी 91 लाखांची कर वसुली

nmc property tax latest marathi news
nmc property tax latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका कर वसुली विभागाने थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी सुरू केलेल्या ढोल बजाव मोहिमेअंतर्गत बुधवारी (ता. १९) तिसऱ्या दिवशी ९१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तीन दिवसात एकूण पावणेतीन कोटी रुपयांची वसुली झाल्याने दिवाळी महापालिकेला दिलासा मिळाला. (Property Tax collection of 91 lakhs on third day of Dhol bajao campaign of NMC Nashik Latest Marathi News)

१२५८ थकबाकीदारांना नोटीस बजावूनही कर अदा केला जात नसल्याने अखेर तीन दिवसांपासून थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवला जात आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी ९१ लाख ६३८० रुपये कर वसुली झाली. पश्चिम विभागात सर्वाधिक सत्तावीस लाख २८ हजार रुपये करवसुली झाली. त्या खालोखाल पंचवटी विभागात १४ लाख १८ हजार ७४५ रुपये कर वसुली झाली. सहा विभागात एकूण १०९ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. तीन दिवसात एकूण दोन कोटी ७४ लाख ३०० हजार ५७१ रुपयांची वसुली झाली.

सुट्टीचे दिवस वगळता १९ दिवस वसुलीची मोहीम सुरू राहणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षाचा कर भरून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. जे कर अदा करणार नाही. त्यांच्या घरासमोर किंवा आस्थापनासमोर ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

nmc property tax latest marathi news
Sakal संवाद | दर्जेदार कामांसाठी नाशिककरांचाही सहभाग हवा : NMC आयुक्तांची अपेक्षा

विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे

नाशिक पूर्व - ८,४७,९६० रुपये
नाशिक पश्चिम - २७,२८,००० रुपये
पंचवटी - १४,१८,७४५ रुपये
नाशिक रोड- ४,७४,७५२ रुपये
सिडको- १८,०६,२३३ रुपये
सातपूर - १८,०३,७४३ रुपये
एकूण - ९१ लाख ६ हजार ३८० रुपये

nmc property tax latest marathi news
Chain Snatching : राजरोसपणे सौभाग्यचंलेणे ओरबाडणे सुरूच; पोलिसांचे मात्र हातावर हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com