Nashik News: पावसाळ्यात उद्याने बंद तरीही देखभाल; महासभेवर अडीच कोटींची देयके

garden (File photo)
garden (File photo)

Nashik News: शहरात महापालिकेच्या जवळपास साडेपाचशे उद्यानांपैकी बहुतांश उद्याने बंद व नादुरुस्तीच्या अवस्थेत असताना उद्याने देखभाल दुरुस्ती झाल्याचे दाखवून जवळपास अडीच कोटी रुपयांचे देयके काढण्यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, उद्यान विभागाकडून देखभाल दुरुस्तीची पाहणी झाल्याशिवाय देयके अदा केली जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आली असली तरी, हे काम महासभेवर देयके सादर होण्यापूर्वीच होणे अपेक्षित असताना ‘वराती मागून घोडे’ हाकण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ५२४ उद्याने आहेत. वास्तविक, उद्याने म्हणता येतील असे पंधरा ते वीस उद्याने आहेत. (proposal was submitted to General Assembly to withdraw payments of 2 5 crores of park maintenance nashik news)

उर्वरित उद्याने हे सोसायटी किंवा लेआउट तयार करताना मनोरंजन पार्क म्हणून दर्शविलेल्या जागा महापालिकेने उद्याने म्हणून विकसित केले आहेत. विकसित उद्यानांची अवस्था असून नसल्यासारखी आहे. उद्यानांमध्ये खेळणी तुटलेली आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत, पाणी नसल्याने सुकलेली झाडे यामुळे बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

अशा अवस्थेत देखभाल व दुरुस्तीची देयके काढली जात आहेत. मार्च २०२३ मध्ये उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबविली न गेल्याने जवळपास २७३ उद्यानांचे देखभाल व दुरुस्तीला मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढदेखील संपुष्टात येत असल्याने देखभाल व दुरुस्तीची कामे झालेल्या उद्यानांचे देयके काढण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे.

...अशी आहे उद्यान दुरुस्ती देयके

पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक दोनमधील उद्यानाचे दहा लाख ५२ हजार रुपये, प्रभाग क्रमांक चार व पाचमधील सोळा उद्यानांचे सात लाख ५१ हजार रुपये, प्रभाग सहामधील सात उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचे ३१ लाख ६९ हजार रुपये, प्रभाग क्रमांक तीनमधील २९ उद्यानांचे ३६ लाख ८४ हजार रुपये, पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एकमधील १२ उद्यानांचे १२ लाख ९० हजार रुपये, सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा व २६ मधील सहा उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे सात लाख ४० हजार रुपये.

garden (File photo)
Nashik News: रामतीर्थावर वाहनांना 2 दिवस ‘नो एन्ट्री’; छटपूजेमुळे वाहतूकमार्गात केला बदल

सातपूर विभागातील प्रभाग नऊमधील पाच उद्यानांचे ३३ लाख ७२ हजार रुपये, प्रभाग क्रमांक आठ व ११ मधील दहा उद्यांचे पाच लाख दहा हजार रुपये, नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील सोळा उद्यानांच्या देखभालीचे एक लाख ५९ हजार रुपये, प्रभाग क्रमांक १८, १९ व २० मधील २३ उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे नऊ लाख ९५ हजार रुपये, सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील उद्यानांचे २१ लाख ९७ हजार रुपये.

सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २९ व ३१ मधील ११ उद्यानांचे १२ लाख ९२ हजार रुपये, प्रभाग २४ व २५ मधील २५ उद्यानांचे १९ लाख ७० हजार रुपये, पश्‍चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील २१ उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे १४ लाख आठ हजार रुपये, प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील २० उद्यानांचे २१ लाख ७४ हजार रुपये, यानुसार देयके अदा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पावसाळ्यातही उद्यानांची देखभाल

वास्तविक, ज्या २७३ उद्यानांचे देयके काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यातील बहुतांश उद्याने पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये बंद असतात. असे असताना आठ महिन्यांचे जवळपास दोन कोटी ४२ लाख रुपयांचे देयके काढली जात आहेत. उद्यानांची खरोखर देखभाल झाली आहे का, देखभालीची पाहणी केली का, असे प्रश्‍न अनुत्तरीतच राहतात. त्यामुळे देयके काढण्यासाठी सुरू असलेली घाई संशयाला कारणीभूत ठरत आहे.

"योग्यतेनुसार झालेल्या कामाचेच देयके अदा केली जाणार आहेत. तक्रारी असलेल्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचे देयके अदा केले जाणार नाही. याउलट असा प्रस्ताव असेल तेथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे." - विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका

garden (File photo)
Nashik News: पार्किंग शुल्काअभावी बुडतोय लाखोंचा महसूल; गोदाघाटावर होतेय किरकोळ पार्किंगवसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com