Nashik Crime News : सिडकोत देहव्यापार; एकास अटक

Arrested News
Arrested Newsesakal

सिडको (जि. नाशिक) : सिडकोत दोन महिलांकडून अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या एकास अटक करून अंबड पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Prostitution case at cidco Arrested one Nashik Crime News)

Arrested News
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास २० वर्षांची सक्तमजुरी

सिडकोतील बुरकुले हॉल पाठीमागील बाजूस एका रो हाऊसमध्ये संशयित धनंजय मोरे हा अनेक महिन्यांपासून दोन महिलांच्या माध्यमातून अनैतिक देहविक्री करण्याचा व्यवसाय चालवत होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख व यांना याबाबतची माहिती मिळाली.

यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून संशयित धनंजय मोरेला अटक केली आहे.

Arrested News
Crime News : परप्रांतातून नागपुरात शस्‍त्रविक्री?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com