धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H32356
धुळे : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात रास्तारोको आंदोलन करतांना विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
---
मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा
---
लोकशाही व संविधान बचाव समितीतर्फे रास्तारोको
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि व्होट चोरी होत असल्याचा आरोप करीत लोकशाही व संविधान बचाव समितीच्या वतीने धुळ्यात मंगळवारी (ता. १३) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी आग्रा रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गांधी पुतळ्यापासून कराचीवाला खुंटपर्यंत पदयात्रा काढत धुळेकरांचे लक्ष वेधले. कराचीवाला खुंट येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनादरम्यान केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
आंदोलनात अतुल सोनवणे, युवराज करनकाळ, साबिर शेठ, भा. ई. नागराळे, सिद्धार्थ जगदेव, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, जयश्री वानखेडे, संगीता जोशी, ज्योती चौधरी, बानुबाई शिरसाट, सुनीता वाघ, डॉ. सुनील पाटील, डॉ. अनिल पाटील, दिलीप चित्ते, राजेंद्र खैरनार, ॲड. सुधीर जाधव, हरिश्चंद्र लोंढे, चिंतामण ताकटे, राहुल खोंडे, मनोज बंब, अजित राजपूत, रावसाहेब कदम, संतोष मिस्त्री, डॉ. हर्शल भामरे, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले.
---