NMC News: आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेसाठी राखीव वेतन निधीतून तरतूद

nmc
nmcesakal

NMC News : महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्यासाठी राखीव वेतन निधीतून तरतूद केली जाणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. वेतन लागू केल्यानंतर वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु आतापर्यंत फक्त तीन हप्त्यांची रक्कम देण्यात आली. (Provision from Reserve Salary Fund for Third Installment Amount of Commission nmc nashik)

दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या हप्त्याची एकत्रित रक्कम अदा करण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली होती. त्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी लेखा विभागाच्या अहवालानंतर निर्णय घेण्याचे मान्य केले.

लेखा विभागाने दिवाळीत देयके अदा करण्यात अडचण येणार असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर आयुक्तांनी असमर्थता दर्शवली.

त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी सेनेने इतर मागण्यांसह वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळावी यासाठी आयुक्तांना निवेदन देत १८ ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

त्या अगोदर संघटनेने आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर वेतन फरकाचा तिसरा हप्ता जानेवारी २०२४ मध्ये, तर चौथा हप्त्याची रक्कम सप्टेंबर २०२४ मध्ये अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संपाचे हत्यार म्यान करण्यात आले.

nmc
NMC News : मनपाचे अर्थकारण 25 टक्क्यांच्या वाट्याने बिघडणार; सिंहस्थ आराखड्यावरून पेच

प्रशासनाने जानेवारी महिन्यात तिसरे हप्त्याच्या रकमेसाठी नियोजन सुरू केले आहे. त्यात राखीव वेतन निधी मोडण्याचा पर्याय समोर ठेवला आहे. महापालिकेला कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी तीन महिन्यांचे वेतन राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

अंदाजपत्रकातदेखील त्याप्रमाणे तरतूद केली जाते. वेतन निधीमध्ये जवळपास २१० कोटी रुपये जमा आहे, दुसऱ्या हप्त्याची ९० कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

तिसऱ्या हप्त्यासाठी ३५ कोटी रुपये लागणार असल्याने ती रक्कम राखीव वेतन निधीत वर्ग केली जाणार आहे. डिसेंबरअखेर २०२३ व २४ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

त्यात तिसऱ्या हप्त्याच्या रकमेसाठी अतिरिक्त तरतूद वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

nmc
NMC News : 1 टक्का निधी मिळविण्यासाठी महापालिकेची धाव; ब्लॅक स्पॉट मुक्तीसाठी परिवहन विभागाला पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com