PSI Success Story: इंजिनियर गायत्रीची पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी! अथक परिश्रमाला अखेर यश

Gayatri Bairagi
Gayatri Bairagiesakal

PSI Success Story : येथील सरदवाडी रोड भागातील इंजिनिअर झालेल्या गायत्री दिगंबर बैरागी हिने अथक परिश्रम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकताच परिक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीचा सत्कार करण्यात आला. (PSI Success Story Engineer Gayatri bairagi promotion to post of Police Sub Inspector nashik)

गायत्रीचे दहावीपर्यंतचे शिक्षक येथील वाजे विद्यालयात झाले असून 12 पर्यंतचे शिक्षक तीने सिन्नर महाविद्यालयातून पुर्ण केले. 12 विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तीने नाशिक येथील के. के. वाघ इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेट्रिकल इंजिनिअरींग शाखेत प्रवेश घेतला.

मुळात हुशार असलेल्या गायत्रीने तेथेही आपली छाप सोडत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. गायत्रीचे वडील एस. टी. महामंडळात नोकरीला असल्याने लहानपणासूनच तीला वडीलांचा नेहमीचा खाकी पोषाख आकर्षित करत होता.

त्यामुळे पोलिस दलात जाण्याची गायत्रीची मनापासून ईच्छा होती. इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तीला बख्खळ पगाराच्या नोकरीच्या संधीही आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न तीला खुणावत होते.

तीची मोठी बहिण वृषाली या शिक्षिका असून त्याही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत असल्याने गायत्रीलाही प्रेरणा मिळत गेली. तसेच आई-वडीलांनासह सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या भावानेही तीला स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी पाठिंबा दिल्याने तीचे मनोबल अधिकच वाढले व तीने पुर्ण तयारीनिशी या परिक्षांच्या अभ्यासास सुरुवात केली.

कुठेलेही कोचिंग क्लास व अभ्यासिकेत न जाता गायत्रीने घरातच परिक्षांची तयारी सुरु केली. दिवसभराच्या अभ्यासाबरोबरच तीने आपल्या शाररिक तयारीकडे लक्ष दिले. दरदरोज पहाटे उठून पळण्यासाठी जाणे, व्यायाम करणे तीने सुरु केले.

एक-दोन वर्ष अथक परिश्रम घेतल्यानंतर मागील वर्षी झालेल्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या जागेसाठी तीने अर्ज करत पुर्व परिक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्याने तीचा मनोबल अधिकच वाढले. त्यानंतर मुख्य परिक्षेच्या तयारीसोबतच तीने शाररिक तयारीचाही वेग वाढवला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gayatri Bairagi
MPSC Success Story: छोट्या गावातला इंजिनिअर झाला पहिला फौजदार!

मुख्य परिक्षेतही उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आपल्या छाप सोडली. त्यानुसार नुकतेच घोषित झालेल्या निकालात तीची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याने गायत्रीसह कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सामान्य कुटुंबातील मुलीने मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवल्याने परिसरासह तीचे मुळ गाव असलेले पुतळेवाडीसह (रामपुर) शहा येथूनही तीच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यामुळे सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांसह अनेकांनी तीचा सत्कार करत तीच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी माजी नगरसेवक हर्षद देशमुख, मयुरेश क्षत्रिय, सागर रायते, अतुल कणसे, सचिन वाघ, प्रशांत बोडके, मयुर पवार यांच्यासह गायत्रीचा भाऊ सागर बैरागी, वडील दिगंबर बैरागी यांच्यासह कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते.

कुटुंबाची साथ महत्वाची

शालेय जीवनापासूनच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते. त्यात पोलिस होऊन देशसेवा करण्याची ईच्छा निर्माण झाली. त्यातूनच प्रेरणा घेऊन मनापासूनच मेहनत केली आली हे यश मिळवता आले.

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना जिद्ध बाळगून प्रयत्न करणे गरजेचे असते. आज लाखो तरुण-तरुणी या परिक्षांचा अभ्यास करतात.

मात्र, काहींकडून अर्ध्यावरच प्रयत्न सोडले जातात. त्यासाठी कुटुंबाची साथ महत्वाची असून अथक मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळत असल्याची भावना गायत्रीने यावेळी व्यक्त केली.

Gayatri Bairagi
PSI Success Story: MPSCच्या पहिल्या प्रयत्नात रोहितची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com