PSI Success Story: शेतकरी कुटुंबातील इंजिनिअर मुलगा झाला पुतळेवाडीचा पहिला फौजदार!

Rushikesh Narode
Rushikesh Narodeesakal

: पुतळेवाडी( ता.सिन्नर) येथील शेतकरी कुटुंबातील शिक्षकाचा मुलगा ऋषिकेश दत्तात्रय नरोडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळवले आहे. पुतळेवाडी सारख्या छोट्या गावात पहिला फौजदार ऋषिकेश ठरला आहे.

केमिकल्स मॅकेनिकल्स इंजिनिअरिंग मध्यें इंजिनिअर होऊन स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. सिन्नरच्या पुर्वेकडील गावांमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळणारा पहिला विद्यार्थी आहे. (PSI Success Story engineer son rushikesh narode from farmer family became first PSI of Putlewadi nashik)

पुतळेवाडीचे दत्तात्रय सोपान नरोडे बेबी नरोडे थोरला यांचा मुलगा ऋषिकेश आहे. श्री. नरोडे व्ही एन नाईक संस्थेच्या गोळे गोंधेगाव (ता.निफाड) येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आहेत. त्यानंतर कोपरगावच्या संजीवनी मध्यें केमिकल मॅकेनिकल्स इंजिनिअरिंग मध्यें इंजिनिअर 2019 ला झाला.

वडील विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून वीस वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला दोन वर्षाचा कालावधी असतान ते आता अनुदान शाळेची वेतन श्रेणी मिळाली आहे.

विना अनुदान शाळेवर शिक्षक असल्याने ऋषिकेश ला धारणगाव (ता. कोपरगाव ) मामाच्या गावाला शिक्षण पुर्ण केले. नरोडे परिवाराला आजी मंदाकिनी चौधरी दीपक चौधरी यांनी पाठबळ दिले.

ऋषिकेश ने इंजिनिअर झाल्यानंतर प्रतिक शिंदे यांच्या सोबत लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.कोपरगावच्या आत्मा मलिक अॅकेडमीत स्पर्धा परीक्षा सराव केला. आज ऋषिकेश पहिल्या प्रयत्नात फौजदार झाला आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rushikesh Narode
PSI Success Story: शेतकऱ्याचा पोरगा झाला फौजदार! एका मार्काच्या हुलकावणीनंतर जिद्दीने यशाला घातली गवसणी

थोरला मुलगा फौजदार अन् धाकटा डाॅक्टर घडला. नरोडे परिवारातील ऋषिकेश व धाकटा मुलगा तेजस यांचे उच्च शिक्षण घेताना आर्थिक कारणांमुळे तारेवरची कसरत करावी लागली आहे.

शिक्षक दत्तात्रय नरोडे ह्या शिक्षकांनी विना अनुदानित शाळेचा विचार न करता शाळेच्या मुलांना शिकवले आहे. घरातील दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले आहे.

त्यात ऋषिकेश थोरला फौजदार अन् धाकटा तेजस मागील वर्षी बी एच एम एस होऊन डाॅक्टर झाला आहे. म्हणताना यश लगेच मिळत नाही हे नरोडे परिवारातील दोन्ही मुलांना बाबत घडले आहे. फौजदार अन् डाॅक्टर मुले घडल्याने नरोडे परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही.

"मी इंजिनिअर झालो.पण प्रशासकीय सेवेचे मोठे आकर्षण होते.त्यामुळे लगेच लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. आज पहिल्या प्रयत्नात फौजदार झाला आहे. हाच साठी अट्टाहास होता." - ऋषिकेश दत्तात्रय नरोडे, पुतळे वाडी

"ऋषिकेश ने फौजदार होऊन डोळ्यांचे पारणे फेडले आहे. त्यांच्या वडीलांनी विना अनुदानित शाळेवर शिक्षक जे काम केले ते पुण्य दोन्ही मुलांना मिळाले आहे."

- बेबी दत्तात्रय नरोडे, ऋषिकेशचे आई.

Rushikesh Narode
PSI Success Story : गंगाधरीतील मेंढपाळाच्या मुलाची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com