सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपची मागणी

सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपची मागणी
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... -- सुलभ शौचालय रात्री अकरापर्यंत सुरू ठेवा -- सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपची मनपाकडे मागणी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : शहरातील ट्रॅव्हल्स पॉइंट, अग्रवाल भवनशेजारील सुलभ शौचालय रात्री नऊलाच बंद केले जात असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. हे शौचालय सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपने महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देत करण्यात आली. - शिरपूर, शहादा व परिसरातून रोज शेकडो प्रवासी धुळ्यात येत असतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, संबंधित सुलभ शौचालयाचे संचालक ‘पाणी नाही’ असे कारण देत रात्री नऊलाच शौचालय बंद करतात. परिणामी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांना उघड्यावर व असुरक्षित ठिकाणी जावे लागत आहे. तरी शौचालय सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत नियमित सुरू ठेवणे, तेथे पाणी, स्वच्छता, वीज व महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था कायमस्वरूपी करणे, सध्याच्या संचालकास बदलून नवीन सक्षम संचालकाची नेमणूक करणे आणि व्यवस्था सुरळीत होईपर्यंत प्रशासनाने लक्ष ठेवणे, अशा मागण्या करण्यात आल्या. सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सिद्धार्थ पारेराव व प्रवीण सूर्यवंशी यांनी हे निवेदन दिले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.