नाशिक रोड- नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स स्कूलजवळील चौकात एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. ‘काका, आम्हाला वाचवा!, अशी भावनिक साद घालत विद्यार्थी, पालक आणि रिक्षाचालकांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांविरोधात आणि सुरक्षेच्या मागणीसाठी एकत्र येऊन आंदोलन केले. या आंदोलनात शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे प्रशासनाला रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागेल.