विषय समित्यांच्या निवडणुका महायुतीच्या समन्वयातून
सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज दाखल; घटक पक्षांना प्रतिनिधित्व
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : महापालिकेतील विधी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य आणि शहर सुधारणा या पाच विषय समित्यांच्या निवडणुका ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महायुती धर्म पाळत सर्व घटक पक्षांना प्रतिनिधित्व देत सभापती व उपसभापती पदांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली.
विधी समितीसाठी जुही शिंदे व अंकिता शिंदे, शिक्षण समितीसाठी प्रा. शरद मोरे व सोनाली भंदुरे, महिला व बालकल्याणसाठी कोमल मेहरोलिया व चित्रा तांदळे, आरोग्य समितीसाठी डॉ. पूनम महाले व सतीश निकम तर शहर सुधारणा समितीसाठी जयश्री गांगुर्डे व जयंत जाचक यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान शिक्षण समितीला वैचारिक व सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने प्रा. शरद मोरे यांची निवड सार्थ असून त्यांच्या अनुभवातून मनपा शाळांचा पायाभूत विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला गती मिळेल, असे महापौरांनी सांगितले.
--------------
असे झालेत अर्ज दाखल
१) महिला व बालकल्याण समिती
सभापती : ॲड. कोमल प्रताप मेहरोलिया (भाजप)
उपसभापती : चित्रा जगन्नाथ तांदळे (भाजप)
२) विधी समिती
सभापती : जुई प्रणव शिंदे (भाजप)
उपसभापती : अंकिता महेंद्र शिंदे (भाजप)
३) शहर सुधारणा समिती
सभापती : जागृती दत्तू गांगुर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस)
उपसभापती : जयंत अशोक जाचक (भाजप)
४) वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती
सभापती : डॉ. पूनम योगेश महाले (शिवसेना)
उपसभापती : सतीश आनंदराव निकम (भाजप)
५) शिक्षण समिती
सभापती : प्रा. शरद चिंतामण मोरे (भाजप)
उपसभापती : सोनाली तुषार भुंदरे (भाजप)