Nashik News: पुण्याच्या धर्तीवर मनपाची सुरक्षा द्यावी किन्नरांच्या हाती! किन्नर बांधवांच्या अपेक्षा

Sinnar Security
Sinnar Securityesakal

Nashik News : पुणे महापालिकेने नुकतीच सुरक्षा व्यवस्था किन्नर बांधवांच्या हातात दिली आहे. किन्नर बांधवांना समाजात स्थैर्य प्राप्त व्हावे, उन्नती व्हावी आणि सन्मान मिळावा हा त्यामागील उद्देश आहे.

पुण्यापाठोपाठ महाराष्ट्रातील सर्व महापालिकेची सुरक्षा किन्नर बांधवांच्या हाती द्यावी, अशी मागणी समस्त किन्नर समाजाने ‘सकाळ’ ला बोलून दाखवली आहे. (Pune municipal security should be given to Kinnars Expectations of Kinnear Community Nashik News)

किन्नर म्हटल्यावर लोक नाक मुरडतात अथवा किन्नर बांधवांशी बोलणे टाळतात. अनेकांच्या मनात किन्नर बांधवांविषयी भीती असते. सामाजिक सन्मान मिळावा म्हणून पुण्याच्या महापालिकेने किन्नर बांधवांना थेट होमगार्डचा गणवेश देत त्यांच्या हातात सुरक्षा यंत्रणा सुपूर्द केली आहेत.

यातून किन्नर बांधवांना रोजगारासह समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान स्थैर्य आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला मिळणार आहे.

नाशिक महापालिकेबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांच्या कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था किन्नर बांधवांच्या हाती सोपवावी, अशी अपेक्षा समस्त किन्नर बांधवांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sinnar Security
Nashik News: दात कोरून पोट भरण्याची वेळ! बांधकाम विभागाकडून किरकोळ कामांवर पैसा खर्च

"स्त्री- पुरुषांना नोकरी व्यवसायात जसे शासनाने सेवा-सुविधा दिल्या आहेत. तसेच किन्नर बांधवांना रोजगाराबरोबरच मानसन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी नाशिकसह इतर महाराष्ट्रातील सर्व महापालिकेची सुरक्षा सुपूर्द करावी. या संदर्भात आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत."

- शिवलक्ष्मी संजय झाल्टे, महामंडलेश्वर, महाराष्ट्र किन्नर आखाडा

"केवळ टाळ्या वाजवून पैसे मागणारे किन्नर समाजाने पाहिले आहे. शिक्षित किन्नर बांधवांना शासकीय कार्यालयीन कामकाज द्यायला हवे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेत हा प्रयोग राबवायला हवा. यातून किन्नर बांधवांना जगण्याची नवी उमेद प्राप्त होईल."

- संजना महाले, किन्नर, नाशिक रोड

Sinnar Security
Nashik News: थायलंडची पेराडा शिकण्यासाठी आली नाशिकला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com