पान-३
२०-१
पुणे विद्यापीठातर्फे
आजची परीक्षा रद्द
नाशिक, ता. ३०ः सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण शनिवारी (ता.३१) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या दिवशीच्या परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान तसेच शाळा, महाविद्यालयांच्या उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येते आहे.
राष्ट्रपतींसह इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे त्यांच्या वाहतूक मार्गावर इतर वाहनांना प्रवेश निर्बंध केले आहेत. एकंदरीत या कालावधीत वाहतुकीवर होणारे परिणाम लक्षात घेता परीक्षेच्या फेरनियोजनाबाबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पुणे विद्यापीठ प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार शनिवारच्या नियोजित सर्व परीक्षा रद्द करत असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. २६ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा निश्चित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्या शिक्षण विभागाने पंचवटी परिसरातील काही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. इतर शाळा, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम आहे. वाहतुकीस येणाऱ्या निर्बंधांमुळे शहर प्रवाशी वाहतूक करणार्या सिटी लिंक बससेवेच्या फेऱ्याही प्रभावित होणार आहे. एकंदरीत यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
------------