नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र मार्च-एप्रिल २०२५ परीक्षांचे आयोजन २५ मार्चपासून केले आहे. त्यानुसार एप्रिलअखेरपर्यंत पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडणार आहेत. अभ्यासक्रमनिहाय परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.