पुणे विद्यार्थी गृह संस्था

पुणे विद्यार्थी गृह संस्था
Published on: 
फोटो - पुणे विद्यार्थी गृहाची इमारत संजय गुंजाळ - गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वटवृक्ष : पुणे विद्यार्थी गृह संस्था -------------------------------------------- गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी विकासाचा ध्यास घेतलेल्या पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या म्हसरूळ शाखेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन १९०९ मध्ये लावलेल्या संस्थेच्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, २०२६ मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एस. एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान केला आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीवर उमटलेली ही मान्यतेची मोहोर आहे. - संजय एन. गुंजाळ पुणे विद्यार्थी गृहाची म्हसरूळ शाखा सुमारे २० एकर परिसरात विस्तारली आहे. १६ जून २००१ रोजी कै. डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुरुवात झाली. सध्या शाळेत दोन हजार १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑगस्ट २००७ मध्ये वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, तर एप्रिल २००८ मध्ये शिक्षणशास्त्र व संशोधन महाविद्यालय सुरू झाले. २०१० मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाची भर पडली. अभियांत्रिकी विभागात संगणक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स, यांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पाच शाखांमधून बी.टेक. अभ्यासक्रम, तसेच एमबीएचे शिक्षण दिले जाते. या विभागात सुमारे एक हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, संगणक केंद्र, क्रीडा सुविधा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, स्टार्टअप आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यावर संस्थेचा भर आहे. स्वायत्ततेमुळे अभ्यासक्रम रचना, अध्यापन पद्धती, मूल्यमापन आणि संशोधन क्षेत्रात अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण मिळून त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. संस्थेच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे. (लेखक पुणे विद्यार्थी गृहाचे कार्यवाह आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.