नाशिक: सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विवाहितेला पुण्यातील युवतींनी मदत केली. मात्र, या मुलींना पीडितेच्या सासरच्यांकडून पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा दावा करुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध करत पिडीतेसह मुलींना न्याय मिळावा, अशी मागणी केली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची भेट घेत शिष्टमंडळाने निवेदन दिले.