पांढुर्ली- दमदार कौशल्यपूर्ण चढाया आणि अप्रतिम पकडींमुळे सतेज क्रीडा मंडळ, बाणेर (पुणे) संघाने साई क्रीडा मंडळ (परभणी) संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून पांढुर्ली (ता. सिन्नर) येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरुष गटाच्या खासदार करंडक स्पर्धेत विजेतेपद पटकावले.