नाशिक : फुकट्यांकडून साडेबारा कोटींची वसुली

Punitive action by railway administration on Without ticket passengers
Punitive action by railway administration on Without ticket passengersesakal

मनमाड (जि. नाशिक) : रेल्वेगाड्या सुरू झाल्याने फुकट्या प्रवाशांची (Without Ticket Passengers) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानक (Railway Station) आणि रेल्वे गाड्यांमधील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट तपासणी पथकाने एक लाख ५० हजार २५१ केसेसद्वारे १२ कोटी ४६ लाख ८३ हजार ४३४ रूपये इतकी दंडात्मक वसुली केली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत रेल्वे प्रशासनाने जवळपास दुप्पट रक्कम वसुल केली आहे. (Punitive action by railway administration on without ticket passengers Nashik News)

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून विनातिकीट प्रवास करणे, अनियमित तिकीट यात्रा व तिकीटाचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष तिकीट तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार, सहाय्यक प्रबंधक अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी पथकाचे निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल ते १५ मे २०२२ या कालावधीत तिकीट तपासणी पथकाने भुसावळ विभागात व्यापक मोहिम राबवून कोट्यवधी रूपयांची दंडात्मक कारवाई केली.

Punitive action by railway administration on Without ticket passengers
नाशिक : कारवाईचा बडगा उगारताच कर्मचाऱ्यांची यादी हातात

मागीलवर्षी १ एप्रिल २०२१ ते १५ मे २०२१ या कालावधीत ७७ हजार ९२३ फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ३० लाख ७६ हजार ९८८ रूपयांची रक्कम वसूल केली गेली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत तिकीट तपासणी पथकाने जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.

Punitive action by railway administration on Without ticket passengers
"पप्पामम्मीच्या लग्नाला यायचं हं!"; एका लग्नाची ‘दुसरी’ भन्नाट गोष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com