धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33441
धुळे : ‘क्यू स्पायडर’मध्ये निवड झालेल्या देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील, प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. पी. एस. पाटील आदी.
--
‘एसएसव्हीपीएस’च्या २२ विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर’मध्ये निवड
--
कंपनीच्या कॅम्पस कनेक्ट उपक्रमांतर्गत तीन महिन्यांची मोफत इंटर्नशिप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : येथील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी.टेक.च्या २२ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत ‘क्यू स्पायडर’ कंपनीत तीन महिन्यांच्या मोफत इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
कंपनीच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत ही निवड केली. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील १६, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागातील पाच तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फुल स्टॅक जावा डेव्हलपर, फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टींग, डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिटिक्स यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. विनोद शिंदे, प्रा. डॉ. जितेंद्र व्यास, प्रा. डॉ. विशाल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या निवड प्रक्रियेचे संयोजन ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. अमोल पाटील, प्रा. हर्षिता सांगळे, प्रा. मनिष तिवारी, प्रा. धीरज जाधव आणि प्रा. वाल्मिक मराठे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.