नऊ महिन्यांत कचरा संकलनचे क्यूआर स्कॅनिंग केवळ ५१ टक्के

नऊ महिन्यांत कचरा संकलनचे क्यूआर स्कॅनिंग केवळ ५१ टक्के
Published on: 
मेन फिचर --- (क्यूआर कोड व कचऱ्याचे संग्रहित छायाचित्र वापरावे) --------- कचरा संकलनचे क्यूआर स्कॅनिंग केवळ ५१ टक्के नऊ महिन्यांतील स्थिती; शासनाच्या नोटिशीनंतर मनपाकडून बीव्हीजी कंपनीला जाब सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : शहरातील घनकचरा संकलनावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी सुरू केलेल्या क्यूआर कोड स्कॅनिंग प्रणालीच्या अंमलबजावणीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत स्कॅनिंगचे प्रमाण सरासरी ५१ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. विशेष म्हणजे, जुलैमध्ये हे प्रमाण घसरून अवघ्या ३५ टक्क्यांवर आले होते. या अनियमित कामकाजाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जळगाव महापालिकेला नोटीस बजावली असून, त्यानंतर महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका असलेल्या बीव्हीजी कंपनीकडून स्पष्टीकरण मागविले आहे. जळगाव महापालिकेने शहरातील अस्थापना, कार्यालय, दुकान तसेच घरांमधून तसेच अन्य ठिकाणांमधून संकलीत होणारा कचरा हा ओला व सुका पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी आयसीटी बेस मॉनेटेरिंग सिस्टिम अंतर्गत शहरात क्यूआर कोड बसविण्यात आले आहे. कचरा संकलन करताना हे क्यूआर कोड स्कॅन करण्याचे काम सफाई मक्तेदार संबंधित कचरा संकलन वाहनावरील कर्मचाऱ्यांकडून करण्याची जबाबदारी आहे. शासनाची मनपाला नोटीस क्यूआर कोड स्कॅनिंग कमी झाल्यास घंटागाड्यांच्या फेऱ्या, कचरा संकलनाची नियमितता आणि प्रत्यक्ष सेवा यांचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. शासनाकडून महापालिकेला नोटीस मिळाल्याने या त्रुटींचे गांभीर्य वाढले आहे. स्कॅनिंगचे प्रमाण कमी का? महापालिकेने बीव्हीजी कंपनीला नोटीस देऊन स्कॅनिंगचे प्रमाण कमी राहण्याची कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच प्रणालीची अंमलबजावणी सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडेही लक्ष लागले आहे. आगामी काळात स्कॅनिंगचे प्रमाण वाढवून डिजिटल नोंदी नियमित ठेवण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे. मे महिन्यातच सुधारणा ‘बीव्हीजी’कडून सप्टेंबरपासून कचरा संकलनाचे कामाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र मे महिन्यात झालेली सुधारणा पुढील महिन्यांत टिकवून ठेवण्यात बीव्हीजीच्या कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला यश आले नाही. (ग्राफ) महिन्यानुसार क्यूआर स्कॅनिंक टक्केवारी महिना...............स्कॅनिंग प्रमाण (टक्के) जानेवारीत..............४५ फेब्रुवारी................५३ मार्च...................५५ एप्रिल..................५७ मे.....................६३ जून..................४५ जुलै..................३५ ऑगस्ट..............४६ सप्टेंबर.............५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com