‘गुणवत्ता’ विभाग NMCचा की ठेकेदारांचा?; बिले मिळवून देण्यासाठी Adjustmentचा फंडा

NMC News
NMC Newssakal

नाशिक : अनेक अर्थाने चर्चेत येत असलेल्या महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाचा आणखीन एक प्रताप समोर आला आहे. या विभागाच्या अभियंत्यांकडून ठेकेदारांना पूरक अशा ऍडजेस्टमेंट केली जात असल्याने यातून कामाचे गुणवत्ता तर राहत नाही उलट महापालिकेलादेखील अतिरिक्त बिले ठेकेदारांना अदा करावी लागत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेला गुणवत्ता व नियंत्रण विभाग मुख्यत्वे कारणीभूत आहे. या विभागात टक्केवारीचे प्रमाण गेल्या सहा- सात महिन्यात वाढल्याने त्याचा परिणाम कामावर दिसून येत आहे. जवळपास दोन टक्क्यांपर्यंत टक्केवारी गेल्याने ठेकेदारानेदेखील कामात हात मारण्यास सुरवात केली आहे. मात्र, याचा परिणाम सर्वसामान्य नाशिककरांचा कररूपी जमा होणाऱ्या पैशाची उधळपट्टी होत आहे. (Quality Department of NMC for Contractors Fund of Adjustment for getting bills Nashik Latest Marathi News)

NMC News
Nashik Railway Gate : नाशिक, इगतपुरी तालुक्यांत 13 ठिकाणी होणार रेल्वे गेट

गेल्या दोन ते अडीच वर्षात जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडल्याने त्यास महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभाग कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुणवत्ता व नियंत्रण विभाग नेमका महापालिकेसाठी काम करतो की ठेकेदारांसाठी, हा संशोधनाचा विषय आहे. त्याला कारण म्हणजे महापालिकेच्या हितापेक्षा ठेकेदारांचेच हित अधिक जोपासले जाते. रस्त्यांच्या कामात कमी थर मारणे, दिखाऊ स्वरूपात काम करणे, कमी माल व तोही दर्जाहीन या प्रकारामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

मोजमापातही हातचलाखी

महापालिकेत एकच गुणवत्ता नियंत्रण विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत ड्रेनेज, उद्यान, पाणीपुरवठा या विभागात होणाऱ्या बांधकामांचे गुणवत्ता नियंत्रण केले जाते. तथापि, गेल्या वर्षभरापासून या विभागात होणाऱ्या कामांची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे. ड्रेनेजलाइनचे खोदकाम करताना जेथे खडक नाही, तिथे खडक असल्याचे गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लिहून दिले जाते.

मुरूम नसताना मुरूम असल्याचे लिहून दिले जाते. चेंबर करताना आतून- बाहेरून प्लॅस्टर करणे गरजेचे असते. मात्र, अशा प्रकारची कामे होताना दिसत नाही. या सगळ्यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचे पूर्ण लक्ष असणे अपेक्षित आहे. मात्र, सगळ्याच पातळ्यांवर ढिसाळ कारभाराचा नमुना इथे दिसून येतो.

NMC News
Child Birth In Train : अभोणा माहेरवाशिणीने रेल्वेत दिला गोंडस बाळाला जन्म!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com