नाशिक: रानभाज्या महोत्सवासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावरील बचत गटांना जागा उपलब्ध करून द्यावी. शेतमालाची प्रतवारी व मूल्यवर्धन करून शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. रानभाज्या महोत्सव हा प्रत्येक तालुक्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.