टँकर ची दुचाकी ला धडक पती ठार पत्नी गंभीर

टँकर ची दुचाकी ला धडक  पती ठार पत्नी गंभीर
Published on: 
पान-१ रघुनाथ भटाटे PAD26B13040 ---------------- राणेनगर ः अपघातस्थळी झालेली गर्दी आणि टँकर -------------------- टॅंकरने धडक दिल्याने पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर -------------- राणेनगर सर्व्हीस रस्त्यावरील घटना -------------- सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता.३ ः राणेनगर सर्व्हीस रस्त्यावरील हॉटेल सेव्हन हेवनजवळ मंगळवारी (ता. ३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास नायरा पेट्रोलियम कंपनीच्या टॅकरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत रघुनाथ एकनाथ भटाटे (६०, रा. साक्षी अपार्टमेंट, चेतनानगर) यांचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. ऐन दिवाळी खरेदीच्या धामधुमीत झालेल्या या अपघातना हळहळ व्यक्त होत आहे. श्री. भटाटे हे पत्नीसह दुचाकीवरून बाजारात निघाले होते. टँकरने (एमएच ४१ एटी ३००१) त्यांच्या दुचाकीला (एमएच १५ एझेड ७०२९) ला जोरदार धडक दिली, त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. याचवेळी टॅंकरचे चाक भटाटे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. भरवस्तीत अवजड टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.